Top Marathi News LIVE: नरेश अरोरांच्या भावाची सुनेत्रा पवारांसोबत चर्चा सुरू
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 19:36 IST2026-02-13T07:52:45+5:302026-02-13T19:36:19+5:30
भारताच्या शेजारील देश असलेल्या बांगलादेशमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. तसेच या निकालांमधून बीएनपी पक्षाला निर्विवाद बहुमत ...

Top Marathi News LIVE: नरेश अरोरांच्या भावाची सुनेत्रा पवारांसोबत चर्चा सुरू
भारताच्या शेजारील देश असलेल्या बांगलादेशमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. तसेच या निकालांमधून बीएनपी पक्षाला निर्विवाद बहुमत मिळालं आहे. आता नव्या सरकारच्या नेतृत्वात बांगलादेशची पुढील वाटचाल कशी असेल, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लोकसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असून, आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याची समाप्ती होणार आहे. जाणून घेऊयात महाराष्ट्रासह देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...
LIVE
13 Feb, 26 : 07:35 PM
रोहिणी आचार्य यांची नितीश कुमारांवर टीका
लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी बिहारमधील मुलींच्या सुरक्षिततेबाबत नितीश कुमार सरकारला धारेवर धरलं आहे. "आज बिहारमध्ये माता-भगिनी आणि मुलींचं आयुष्य, सन्मान आणि सुरक्षा धोक्यात आली आहे. अशा परिस्थितीत नितीश कुमार कोणत्या तोंडाने सुशासनाचा दावा करतात?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राज्यात बलात्काराच्या घटना वाढल्या असून मुलींचा संशयास्पद मृत्यू होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. वाचा सविस्तर
13 Feb, 26 : 07:30 PM
बुधवार पेठेत पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन
बुधवार पेठेत पुणे पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. यानंतर वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणे, बांगलादेशी महिला आणि अमली पदार्थ हे कोम्बिंगदरम्यान दिसून आल्याने तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
13 Feb, 26 : 06:47 PM
'१२ फेब्रुवारी रोजी विलिनीकरण होणार, हे आम्ही ऐकले होते', अजित पवारांच्या आमदाराचे विधान
"दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण शंभर टक्के झाले पाहिजे. जर दोन्ही पक्षांना वाटत असेल की, आपला नेता गेला. नेत्याला खरी श्रद्धांजली वाहायची असेल, तर त्यांचं जे दोन-तीन महिन्यापासून सुरू होतं की, दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण व्हावे, तसे झाले तर आम्हाला आनंद होईल", असे म्हणत आमदार खोसकर यांनी विलिनीकरणाची चर्चा सुरू होती यालाही दुजोरा दिला.
"सुनेत्रा पवार या गॉडफादर आहेत. पण, त्यांच्या मागे दोन्ही पक्षांनी भक्कम पाठिंबा द्यायला हवा. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. जयंत पाटील हे अनुभवी नेते आहेत. बाळासाहेब पाटील आहेत. राजेश टोपे हे आहेत. विलिनीकरण झाले, तर आम्हाला मोठा दिलासा मिळेल. ही चांगली गोष्ट होईल", असेही आमदार खोसकर म्हणाले आहेत.
"दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू होती. १२ फेब्रुवारी रोजी विलिनीकरण होणार, हे आम्ही ऐकले होते. दादांनी आम्हाला तशी कल्पना दिली नव्हती. पण, विलिनीकरण होणार हे शंभर टक्के माहिती होती. आमच्या कानावर विलिनीकरणाची चर्चा येत होती. विलिनीकरण जर झाले, तर राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार या असाव्यात. शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यावा. शशिकांत शिंदे जे विलिनीकरणाबाबत जे म्हणत आहेत, ते शंभर टक्के झाले पाहिजे", अशी भूमिका आमदार हिरामण खोसकर यांनी मांडली आहे.
13 Feb, 26 : 06:46 PM
नरेश अरोरांच्या भावाची सुनेत्रा पवारांसोबत चर्चा सुरू
राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या भावाने सुनेत्रा पवारांची भेट घेतली असून दोघांमध्ये चर्चा सुरू आहे.
13 Feb, 26 : 06:34 PM
अमोल बालवडकरांचा भाजपाला थेट इशारा
“माझ्याकडे एक असा विषय आहे की, मी तो योग्य वेळी काढला आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडला, तर भाजपच्या केंद्रातील एका मंत्र्याचे निलंबन होऊ शकते” असा अप्रत्यक्ष इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिला आहे.
13 Feb, 26 : 05:33 PM
पंतप्रधान मोदींनी तारिक रहमान यांना फोन करून दिल्या शुभेच्छा
"मिस्टर तारिक रहमान यांच्याशी संवाद साधून खूप आनंद झाला. बांगलादेशातील जनतेने दिलेल्या या कौलाचे आम्ही स्वागत करतो. दोन जवळचे शेजारी म्हणून भारत आणि बांगलादेशचे ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंध अत्यंत दृढ आहेत. बांगलादेशातील जनतेची प्रगती, शांतता आणि समृद्धीसाठी भारत सदैव कटिबद्ध राहील," असं पंतप्रधान मोदींनी म्हटले
13 Feb, 26 : 05:17 PM
महाराष्ट्रातील तरुणाचा विजयच्या राजकीय मेळाव्यात मृत्यू
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय याच्या तमिळगा वेत्री कळघम या पक्षाच्या मेळाव्यात सहभागी झालेल्या एका ३७ वर्षीय महाराष्ट्रीयन तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सूरज असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, तो सेलम येथे वास्तव्यास होता. सभा सुरू असतानाच तो अचानक जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध झाला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
#WATCH | Tamil Nadu: Body of 37-year-old man from Maharashtra, identified as Suraj, who died after reportedly suffering a heart attack during TVK's political meeting in Salem today, being taken from MH Hospital
— ANI (@ANI) February 13, 2026
Police say, "During the event, he suddenly collapsed. He was rushed… https://t.co/cdD2S06XTjpic.twitter.com/eTCxkaDEzl
13 Feb, 26 : 04:48 PM
मुंबईत शेजाऱ्यांना घरातून येत होता वास, मिळाला तरुणाचा मृतदेह
मुंबईतील सांताक्रूझमध्ये एका बंद असलेल्या घरातून दुर्गंधी येत होती. शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. दरवाजा उघडल्यानंतर घरात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला.
मृतदेह सापडलेल्या तरुणाचे नाव रणजित आहे. तो मित्र विक्कीसह वाकोल्यात राहत होता. दोघांमध्ये भांडण झाले होते, असे शेजाऱ्यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी विक्की सकाळीच बॅग घेऊन निघून गेला होता.
घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दरवाजा उघडला, तेव्हा त्यांना आत रणजितचा मृतदेह मिळाला.
13 Feb, 26 : 02:42 PM
टी-२० विश्वचषकात मोठा उलटफेर! झिम्बाब्वेनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला २३ धावांनी हरवलं
टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये आज क्रिकेट चाहत्यांना एक अविश्वसनीय चमत्कार पाहायला मिळाला. ज्या ऑस्ट्रेलियाला जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते, त्याच ऑस्ट्रेलियाचा झिम्बाब्वेने २३ धावांनी पराभव केला आहे. या विजयामुळे झिम्बाब्वेने केवळ दोन गुणच मिळवले नाहीत, तर जागतिक क्रिकेटमध्ये आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
13 Feb, 26 : 02:06 PM
रेरा निवृत्त नोकरशहांचे 'रिहॅबिलिटेशन सेंटर'; सुप्रीम कोर्टाचे कार्यपद्धतीवर ताशेरे
रेरा या संस्थेच्या काम करण्याच्या पद्धतीवर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. ज्या हेतूने रेराची स्थापना करण्यात आली होती, तो पूर्णपणे भरकटला असून ही संस्था आता केवळ डिफॉल्टर बिल्डरांना फायदा पोहोचवण्याचे काम करत आहे. असे असेल तर रेरा बंद करणेच जास्त चांगले ठरेल," अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने आपला संताप व्यक्त केला.
13 Feb, 26 : 01:31 PM
झिम्बाब्वे 'गेम' फिरवणार? 'पॉवरप्ले'मध्ये ऑस्ट्रेलिया ४ बाद ३८
बलाढ्य ऑस्ट्रेलियापुढे झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत २ बाद १६९ धावा केल्या. १७० धावांचा पाठलाग करताना पहिल्या ६ षटकांत ऑस्ट्रेलियाने ३८ धावांत ४ बळी गमावले. त्यामुळे झिम्बाब्वेचे गोलंदाज ऑस्ट्रेलिया हरवून मोठा उलटफेर करणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
13 Feb, 26 : 01:14 PM
पंतप्रधानांनी कौतुक केलेला ‘कलाकार कट्टा’ स्थलांतरित? भाजपचे पालिका आयुक्तांना पत्र
पुण्यात भाजपच्या माजी नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांच्या संकल्पनेतून गुडलक चौकातील ‘कलाकार कट्टा’ साकारण्यात आला. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये या कलाकार कट्ट्याचे कौतुक केले. मात्र, हा कट्टा इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत आणि पालिका आयुक्तांना या स्थलांतरणासाठी लेखी पत्र दिले आहे.
13 Feb, 26 : 12:15 PM
धुळे महानगरपालिकेतील महापौरांचे दालन सज्ज, महापौर आज पदभार स्वीकारणार
धुळे महापालिकेतील महापौरांचे दालन गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून बंद ठेवण्यात आले होते अखेर हे दालन महापौरांसाठी आज सज्ज करण्यात आले असून आकर्षक पद्धतीने हे महापौरांचे दालन सजविण्यात आले आहे. धुळे महापालिकेच्या महापौर पदाचा मायादेवी परदेशी आणि उपमहापौर पदाचा ज्योत्स्ना पाटील ह्या मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या पदभार स्वीकारणार असून यानिमित्त महापालिकेत जय्यत तयारी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
13 Feb, 26 : 11:45 AM
वसईमध्ये कंपनीला भीषण आग, कामण येथील आएशा कंपनीला लागली आग
वसईजवळील कामण आएशा कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीचं कारण अद्यापतरी अस्पष्ट आहे, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे.
13 Feb, 26 : 11:27 AM
टी२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली, झिम्बाब्वेची प्रथम फलंदाजी
ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे आर. प्रेमदासा स्टेडियमवर एक महत्त्वाचा सामना खेळत आहेत. दोन्ही संघांचे सामना जिंकून पॉइंट टेबलमधील आपले स्थान मजबूत करण्याचे लक्ष्य आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
13 Feb, 26 : 11:25 AM
एअर इंडियाच्या विमानातून आणला गांजा, ३२ वर्षीय तरुणाला अटक, ५ कोटी ३२ लाखांचा गांजा जप्त
पुणे विमानतळावर ५ कोटी ४२ लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. एअर इंडियाच्या विमानातून कोट्यवधी रुपये किंमत अससलेला हा गांजा आणण्यात आला होता. या प्रकरणी ३२ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
13 Feb, 26 : 10:59 AM
लाच प्रकरणात चौकशीतून काही माझ्यापर्यंत आलं तर मी राजीनामा देईन- मंत्री नरहरी झिरवाळ
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागातील कारकूनाला लाच घेताना एसीबीने अटक केली. त्यानंतर प्रतिक्रिया देताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी जर खरंच त्याच्याशी माझा संबंध सापडला तर राजीनामा देईन असं म्हटलं आहे. मंत्र्यांकडे असलेले कर्मचारी मुख्यमंत्र्यांनी बारकाईने तपासून दिले आहेत, असेही नरहरी झिरवाळ म्हणाले.
13 Feb, 26 : 10:48 AM
मुंबई: गोरेगावमधील इमारतीच्या नवव्या मजल्यावर भीषण आग
मुंबईतील गोरेगाव येथील एका ४५ मजली इमारतीच्या नवव्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
13 Feb, 26 : 10:15 AM
शेअर बाजारात ब्लॅक फ्रायडे; Sensex ८०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला
जागतिक बाजारपेठेत एआयबाबत (AI) वाढलेली भीती, अमेरिकन बाजारातील मोठी घसरण आणि कमोडिटी बाजारातील कमजोरीचा परिणाम भारतीय बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहे. बाजार उघडताच सेन्सेक्स सुमारे ८०० अंकांनी घसरून ८२,८७४ वर आला, तर निफ्टी २२० अंकांच्या घसरणीसह २५,५८० च्या आसपास व्यवहार करत होता.
शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात जोरदार घसरणीसह झाली.#sharemarket#investment#moneyhttps://t.co/0rsz3oRhBR
— Lokmat (@lokmat) February 13, 2026
13 Feb, 26 : 10:08 AM
जालना पोलीस भरतीला उत्स्फूर्त प्रतिसाद; १,७३२ उमेदवार पात्र
आज दिनांक १३ (शुक्रवार) रोजी सकाळी ९ वाजता मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्हा पोलीस दलातील शिपाई पदांच्या भरती प्रक्रियेला जिल्ह्यातील युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीत आतापर्यंत तब्बल १ हजार ७३२ उमेदवार पात्र ठरले आहेत. पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर सुरू असलेल्या या भरती प्रक्रियेला बुधवार (ता. ११) पासून प्रारंभ झाला असून, गुरुवार (ता. १२) रोजीही मोठ्या संख्येने उमेदवार उपस्थित होते. याबाबतची माहिती आयुष नोपाणी यांनी दिली.
13 Feb, 26 : 09:59 AM
कर्नाटकमध्ये भीषण अपघात; ट्रक, कार आणि दुचाकीच्या धडकेत ७ जण ठार
कर्नाटकमध्ये मोठा अपघात घडला असून होस्कोट-दबासपेट राष्ट्रीय महामार्गावर ट्रक, कार आणि दुचाकी यांच्यात भीषण धडक झाली. या धडकेत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
VIDEO | Karnataka: Seven people killed in a series of collisions between canter truck, bike and a car on Hoskote-Dabaspet National Highway.#KarnatakaNews
— Press Trust of India (@PTI_News) February 13, 2026
(Source: Third Party)
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/ZbZWpo6PxC
13 Feb, 26 : 09:58 AM
तेलंगाणामधील पालिका निवडणुकीच्या प्राथमिक कलांमध्ये काँग्रेसने घेतली आघाडी,
तेलंगाणामधील पालिका निवडणुकीच्या प्राथमिक कलांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे, आतापर्यंतच्या कलांमध्ये बीआरएस दुसऱ्या तर काँग्रेस तिसऱ्या स्थानी
13 Feb, 26 : 09:57 AM
डेव्हलपर्सच्या माजी संचालकाला ८५ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी अटक
ED Action On Rajendra Lodha: रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकित कंपनी लोढा डेव्हलपर्स लिमिटेडशी संबंधित एक मोठं प्रकरण समोर आलं आहे. सक्तवसुली संचालनालयानं (ED) कंपनीचा माजी संचालक राजेंद्र लोढाला ८५ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार (मनी लाँड्रिंग) प्रकरणात अटक केली.
रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकित कंपनी लोढा डेव्हलपर्स लिमिटेडशी संबंधित एक मोठं प्रकरण समोर आलं आहे.#lodha#rajendralodha#EnforcementDirectoratehttps://t.co/yI2KTeXPo4
— Lokmat (@lokmat) February 13, 2026
13 Feb, 26 : 09:20 AM
तेलंगाणामधील पालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात
तेलंगाणामधील पालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे
#WATCH | Telangana: Counting of votes for Municipal election is underway in Wardhannapet, Warangal District. The Police and Election Commission have made arrangements for the counting of votes at the centres. pic.twitter.com/ap8oW61TZH
— ANI (@ANI) February 13, 2026
13 Feb, 26 : 09:20 AM
माजी मंत्री रणंजित देशमुख यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट
माजी मंत्री रणंजित देशमुख यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट काढण्यात आलं आहे. धनादेश न वटल्या प्रकरणी सुनावणीस वारंवार गैरहजर राहिल्याने हे वॉरंट काढण्यात आलं आहे
13 Feb, 26 : 08:46 AM
लोढा डेव्हलपर्सच्या राजेंद्रसिंह लोढा यांना ईडीकडून अटक
लोढा डेव्हलपर्सच्या राजेंद्रसिंह लोढा यांना ईडीने अटक केली आहे
13 Feb, 26 : 08:19 AM
बांगलादेशमधील निवडणुकीच्या मतमोजणीच्या कलांनुसार आतापर्यंत बीएनपीचा १५१ जागांवर विजय
बांगलादेशमधील निवडणुकीच्या मतमोजणीच्या कलांनुसार आतापर्यंत बीएनपीने १५१ जागांवर विजय मिळवला आहे.
Bangladesh Polls: Projected results show BNP winning in 151 constituencies
— ANI Digital (@ani_digital) February 13, 2026
Read @ANI Story |https://t.co/hmDIJJaP3p#BangladeshPolls#BNP#constituenciespic.twitter.com/5JBnz3P2TT