शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाची बातमी! राज्याला मिळणार आणखी ३ वंदे भारत एक्स्प्रेस? २ मुंबईहून, १ पुण्यातून सुटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 11:51 IST

Vande Bharat Express Train: दिवाळीत काही वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Vande Bharat Express Train: आताच्या घडीला देशभरात ३४ वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची सेवा सुरू झाली असून, आणखी ९ मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत. दिवाळीच्या दरम्यान ९ नवीन वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण केले जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. यामध्ये महाराष्ट्राला आणखी तीन वंदे भारत एक्स्प्रेस मिळण्याची शक्यता असून, यातील २ वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईतून, तसेच एक वंदे भारत एक्स्प्रेस पुण्यातून सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

भारतीय रेल्वेची वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन आताच्या घडीला सर्वाधिक लोकप्रिय सेवा असून, प्रवाशांची पसंती या ट्रेनना मिळत आहे. सन २०१९ मध्ये पहिली वंदे भारत एक्स्प्रेस दिल्ली ते वाराणसी मार्गावर चालवण्यात आली होती. शताब्दी ट्रेनच्या मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवल्या जात आहेत. यानंतर आता स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. याशिवाय सर्वसामान्यांसाठी वंदे मेट्रो आणि साधारण वंदे भारत ट्रेन चालवण्याची रेल्वेची योजना आहे. देशभरात या ट्रेन चालवल्या जाणार असून, अन्य राज्यांकडूनही अधिक वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन चालवण्याची मागणी होत आहे. 

राज्याला मिळणार आणखी ३ वंदे भारत एक्स्प्रेस?

मुंबई-गोवा, मुंबई-साईनगर शिर्डी, मुंबई-सोलापूर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस पुण्यावरुन जाते. परंतु आतापर्यंत पुण्याहून सुटणारी एकही वंदे भारत एक्स्प्रेस नाही. आता पुणे ते सिकंदराबाद अशी थेट धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होण्याची शक्यता आहे. देशभरात दिवाळीत नऊ वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे. त्यात पुणे ते सिंकदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसचा समावेश आहे, असे म्हटले जात आहे. याशिवाय, मुंबई ते कोल्हापूर आणि मुंबई ते जालना या मार्गांवरही वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, दिवाळीत देशात ९ वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे. त्यातील ३ वंदे भारत एक्स्प्रेस मध्य रेल्वे विभागात चालवण्यात येणार आहे. दुसरीकडे, इंदोर-भोपाळ या मार्गावर चालवण्यात येणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा अगदीच अत्यल्प प्रतिसाद मिळत होता. या पार्श्वभूमीवर आता ही वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचा सेवा विस्तार नागपूरपर्यंत करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसMumbaiमुंबईPuneपुणे