शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Exit Poll: महायुती सत्ता राखणार; द्विशतक गाठणार; महाआघाडी पुन्हा सत्तेपासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 18:52 IST

राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार; महाआघाडी पुन्हा विरोधी पक्षात

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात आज मतदान पार पडलं. यानंतर आता मतदारराजा राज्याचा कारभार कोणाकडे देणार, राज्याचे कारभारी बदलणार की तेच राहणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज ग्रामीण भागानं भरभरुन मतदान केलं, तर शहरी भागांमधील मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. याच पार्श्वभूमीवर एबीपी माझा आणि सी व्होटरनं केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यात महायुतीची सत्ता कायम राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुपारी 3 पर्यंतचं मतदान गृहित धरून हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही महायुतीच विजयी होईल, अशी सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते. या सर्वेक्षणानुसार महायुतीला 192 ते 216 जागा मिळू शकतात. सध्या विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पुढील पाच वर्षेदेखील विरोधी बाकांवरच बसावं लागण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणानुसार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीला 55 ते 81 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मागील निवडणुकीत राज्यात सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी 122 जागा जिंकत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर शिवसेना 63 जागा जिंकून दुसऱ्या स्थानी राहिली होती. त्यावेळी काँग्रेसला 42, राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी निवडणुकीचा निकाल जाहीर होताच राष्ट्रवादीनं भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला. यानंतर काही दिवसांत शिवसेना सत्तेत सहभागी झाली होती. विभागनिहाय अंदाज-

मुंबई (एकूण जागा 36)महायुती- 29 ते 33महाआघाडी- 0 ते 6इतर- 1 ते 2

ठाणे कोकण (एकूण जागा- 39)महायुती- 30 ते 34महाआघाडी- 3 ते 7इतर- 1 ते 3

मराठवाडा (एकूण जागा- 46)महायुती 25 ते 29महाआघाडी- 12 ते 16इतर- 0 ते 7

उत्तर महाराष्ट्र (एकूण जागा- 35)महायुती- 21 ते 25महाआघाडी- 11 ते 15इतर- 0 ते 1

विदर्भ (एकूण जागा- 62)महायुती- 47 ते 51महाआघाडी- 6 ते 10इतर- 2 ते 4

पश्चिम महाराष्ट्र (एकूण जागा- 70)महायुती- 40 ते 44महाआघाडी- 23 ते 27इतर- 0 ते 3 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस