शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 :...म्हणून संघाच्या कार्यक्रमाला गेलो होतो, नितेश राणेंनी सांगितले नेमके कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 13:22 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : कणकवली मतदारसंघातून भाजपाकडून निवडणूक लढवत असलेले नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांचे संघाच्या कार्यक्रमातील छायाचित्र चर्चेचा विषय ठरले आहे.

कणकवली - कणकवली मतदारसंघातून भाजपाकडून निवडणूक लढवत असलेले नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांचे संघाच्या कार्यक्रमातील छायाचित्र चर्चेचा विषय ठरले आहे. अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत भाजपाच्या विचारसरणीवर टीका करणाऱ्या नितेश राणे यांनी थेट संघाच्या कार्यक्रमास उपस्थिती लावल्याने त्यांना सोशल मीडियावरून ट्रोल करण्यात येत आहे, दरम्यान, स्वत: नितेश राणे यांनी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यामागचे नेमके कारण स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना नितेश राणे यांनी सांगितले की, ''मी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आता मी ज्या पक्षात आलो आहे. त्या पक्षाला समजून घेणे, त्या पक्षाच्या मातृसंस्थेला समजून घेणे गरजेचे आहे. म्हणून मी संघाच्या कार्यक्रमाला गेलो होतो.'' तसेच मला ओळखणारे लोक मला ट्रोल करणार नाहीत, असा विश्वासही राणेंनी व्यक्त केला. ''सत्तेची जोड मिळाल्यास मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडवता येतील. रखडलेले प्रश्न मार्गी लावता येतील. म्हणूनच भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. कोकणच्या विकास डोळ्यासमोर ठेवूनच आदरणीय नारायण राणेंनी भाजपाप्रवेशाचा निर्णय घेतला आहे,'' असे सांगत नितेश राणेंनी या निर्णयाचे समर्थन केले.  दरम्यान, नितेश राणेंच्या या संघबैठकीचं वडील नारायण राणेंनी समर्थन केले होते. ''संघाच्या कार्यक्रमात जाणं यात चुकीचं काय. संघात जाणं चुकीचं नाही, मीही संघात जाईन, संघाच्या प्रमुखांना भेटेन. जायचंच तर मनापासून जायचं असं म्हणत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नितेश राणेंच्या संघ कार्यक्रमातील बैठकीचं समर्थन केलं आहे. माझी विचारधारा ही हिंदुत्ववादीच आहे. काँग्रेसमध्ये जाणं हा माझा नाईलाज होता,'' असेही स्पष्टीकरण राणेंनी दिले. भारतीय जनता पक्षाची विचारधारा मी मान्य केलीय आणि संघाची विचारधाराही मी मान्य करतो, असे म्हणत संघाच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिल, असेही राणेंनी म्हटले आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nitesh Raneनीतेश राणे BJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघkankavli-acकणकवली