शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: शाळेमध्ये पोरालां फटकारलं की तो बापाला घेऊन यायचा; अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 19:28 IST

Maharashtra Election 2019: आपले सर्व पहलवान तेल लाऊन मैदानात उतरलेत. मात्र, समोर दुसरा पहलवानच दिसत नसल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होत.

विधानसभा निवडणूकीचा प्रचार सुरु झाला असून काही दिवसांवर मतदान आलं आहे. पण निवडणुकीत मजाच येत नाहीए, कारण समोर कोणी दिसतच नाही. आपले सर्व पहलवान तेल लाऊन मैदानात उतरलेत. मात्र, समोर दुसरा पहलवानच दिसत नसल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होत. यावर कोणी विरोधकच समोर नसल्याचे मुख्यमंत्री म्हणताय मग पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात आखाडा खोदायला येताय का? असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.  

अमोल कोल्हे म्हणाले की, राज्यातील उद्योगधंदे आलेले असताना सरकार याकडे दुर्लक्ष करते आज युवकांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे, तरी देखील राज्य सरकार गाफील आहे. तसेच मॅग्नेटिक महाराष्ट्राची स्वप्न लोकांना दाखवण्यात आली होती, मात्र या माध्यमातून नोकरी कोणालाच उपलब्ध झाली नसल्याची टीका त्यांनी भाजपा सरकारवर केली. त्याचप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाटत होतं चांगला भाव मिळेल, मात्र सरकारकडून निर्यातीवर बंदी घालून पाकिस्तानमधून कांदा आयात करायला सुरुवात केली असल्याचे देखील अमोल कोल्हेंनी यावेळी सांगितले. सिन्नर विधानसभेचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. 

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी देशाच्या पंतप्रधानांना दहा सभा तर गृहमंत्री अमित शहांना वीस सभा घ्यावा लागतात. यामध्येचं भाजपा सरकारचे अपयश दिसून येतं असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शाळेमध्ये एखाद्या पोरालां फटकारलं की तो पोरगा बापाला शाळेत घेऊन यायचा, अशीच परिस्थिती मुख्यमंत्र्यांवर आली तर नाही ना? असा टोला देखील अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना लगावला आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसsinnar-acसिन्नरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा