शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : चंपानंतर 'नाच्या', अजित पवारांकडून माजी मंत्र्यांवर सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 15:38 IST

Maharashtra Election 2019 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा येथे आयोजित राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत अजित पवार बोलत होते.

मंगळवेढा : भाजप सरकारने मागील पाच वर्षात फक्त आश्वासनांची घोषणाबाजी केली. दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी सत्तेचा गैरवापर करीत शेतकरीविरोधी धोरण अवलंबिले, असे म्हणत अजित पवार यांनी भाजपा सरकारवर शेतकरीविरोधी असल्याचा आरोप केला. त्यानंतर, अजित पवारांनीसोलापूरचे माजी पालकंमत्री आणि भाजपा नेते लक्ष्मण ढोबळे यांच्यावरही सडकून टीका केली. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा येथे आयोजित राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत अजित पवार बोलत होते. शेतीच्या उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर वाढला. त्याच नैराश्येतून राज्यातील 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे राज्यातील 16 हजार आयाबहिनी विधवा झाल्याची खंत पवार यांनी बोलून दाखवली. त्याचवेळी, राष्ट्रवादीचे पूर्वाश्रमीचे नेते आणि सध्याचे भाजपा उमेदवार लक्ष्मण ढोबळे यांच्यावरही सडकून टीका केली. भाजपाचा झेंडा घेऊन नाचतानाचा ढोबळे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरुन अजित पवारांनी ढोबळेंना लक्ष्य केलं.  

हलगीच्या तालावर झिंगाट झालेल्या नाच्याच्या शब्दावर विश्वास ठेवू नका. सारखे-सारखे कुंकू बदलणारे तुमच्याशी प्रामाणिक काय राहणार अशी टीका अजित पवार यांनी लक्ष्मणराव ढोबळे यांच्यावर केली. काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना आमदार केले, पालकमंत्री केले, ते उपकार विसरले की काय? आपले वय काय, आपण काय करतो याचेही भान नाही, असा टोलाही ढोबळेंना अजित पवारांनी लगावला. यापूर्वी, अजित पवारांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना चंपा म्हणून त्यांची खिल्ली उडवली होती. दरम्यान, गेल्या पाच वर्षात सरकारनं शेतकऱ्यांना मातीत घालण्याचे काम केले़ शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी पाकिस्तानमधून साखर, कांदा आयात करण्यात सरकार व्यस्त आहे. कर्जमाफी कशी करायची ते माझ्या काकांना विचारा असा, सल्लाही अजित पवार यांनी भाजप सरकारला दिला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Solapurसोलापूर