शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंची सलग दुसऱ्या दिवशी बॅग तपासली; टीकेवर आले निवडणूक आयोगाचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 16:30 IST

Uddhav Thackeray News: ठाकरेंनी बॅगा तपासणाऱ्या अधिकाऱ्यांना अशाच मोदी, शाह, शिंदेंच्या बॅगा तपासा, असे म्हटले आहे. यावर आता निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅगा तपासल्यावरून महाराष्ट्रात राजकीय टीका सुरु झालेली असतानाच आज सलग दुसऱ्या दिवशी देखील ठाकरेंच्या बॅगांची झडती घेण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यावरून ठाकरेंनी तपासणाऱ्या अधिकाऱ्यांना अशाच मोदी, शाह, शिंदेंच्या बॅगा तपासा, असे म्हटले आहे. यावर आता निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. 

काल वणी येथे ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची आणि बॅगांची निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती. आज सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्यांनी ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली, आजची घटना लातूरमध्ये घडली आहे. औसामध्ये प्रचारसभेसाठी आलेल्या ठाकरे यांनी आजही संताप व्यक्त केला. आजवर कोणाकोणाच्या बॅगा तपासल्या असा सवाल ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना केला आहे. 

योगायोग म्हणजे उद्धव ठाकरे हेच पहिले या दोन्ही मतदारसंघांत हेलिकॉप्टरने पोहोचले आहेत. यामुळे अधिकाऱ्यांनीही ठाकरेंना जशासतसे उत्तर देत तुम्हीच पहिले आहात असे सांगितले. यावर ठाकरेंनीही मीच पहिला गिऱ्हाईक का, असा सवाल विचारला आहे. याचा व्हिडीओ ठाकरेंनीच शूट करून सोशल व्हायरल केला आहे. असे असले तरी निवडणूक आयोगाने याची दखल घेतली असून यंत्रणा नियमावलीनुसार आपले काम करत असल्याचे म्हटले आहे. 

तसेच लोकसभा निवडणुकीत 24 एप्रिल 2024 रोजी बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेण्यात आली होती आणि 21 एप्रिल 2024 रोजी बिहारच्या कटिहार जिल्ह्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेण्यात आली होती, असेही आयोगाने म्हटले आहे.

सुरेश प्रभू, एकनाथ शिंदेंपासूनचे बॅगा न तपासणी प्रकरण...प्रचारावेळी नेत्यांच्या हेलिकॉप्टरमधून सर्रास बॅगा उतरत असतात. काही वर्षांपूर्वी सुरेश प्रभू मंत्री असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमधून बॅगा उतरविण्यात आल्या होत्या. यावेळी विरोधकांनी त्यांच्या बॅगा तपासण्याची मागणी केली होती. परंतू, बॅगांची तपासणी न झाल्याने राजकीय आरोप झाले होते. तसेच लोकसभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील बॅगा उतरविल्या होत्या. यावेळी देखील ठाकरे शिवसेनेने शिंदेंनी करोडो रुपये बॅगेतून नेल्याचा आरोप केला होता. यानंतरच्या दौऱ्यात शिंदेंची बॅग तपासण्यात आली होती, तेव्हा विरोधकांनी हा फार्स असल्याचे म्हटले होते.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Shiv Senaशिवसेना