शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 11:39 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: जातनिहाय जनगणनेमुळे वस्तुस्थिती कळेल आणि आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंबंधी चित्र स्पष्ट होईल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मविआने काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते बुधवारी आपल्या प्रचाराचा नारळ मुंबईत फोडला. बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर आयोजित महाराष्ट्र स्वाभिमान सभेत पाच महत्त्वाच्या घोषणा असणारे 'गॅरंटी कार्ड' आघाडीने जाहीर केले. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार उपस्थित होते. यानंतर आता महाविकास आघाडीचे नेते प्रचारावर भर देताना पाहायला मिळत आहेत. 

महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ३ हजार रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास लागू करणार. शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन देणार. जातनिहाय जनगणना करणार, ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न करणार. २५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे दिली जाणार. बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४ हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाणार, अशा पाच मोठ्या घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आल्या आहेत. शरद पवार यांनी सभांवर भर दिल्याचे दिसत आहे. 

महाराष्ट्राच्या परिवर्तन हवे

मीडियाशी बोलताना शरद पवार म्हणाले की, प्रचाराची सुरुवात आम्ही केली आहे. महाराष्ट्राच्या जनतेला परिवर्तन हवे आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम आम्हाला करावे लागणार आहे. आम्ही आता राज्यांमध्ये दौऱ्यांवर निघालो आहोत. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही सर्व शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करू तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये परतावा दिला जाईल, असे शरद पवार यांनी म्हटले.

दरम्यान, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ही मागणी आम्ही मागची तीन वर्षे करत आहोत. त्यामुळे वस्तुस्थिती कळेल आणि आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंबंधीचे चित्र स्पष्ट होईल, असे शरद पवार म्हणाले. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली होती. चौफेर टीका झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली. या प्रकरणी शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यावर भाष्य केले नाही.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी