शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

सुनील केदार हा विंचू, इतका विश्वासघात मित्रपक्षाने करू नये; ठाकरे गट संतापला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 12:24 IST

रामटेक मतदारसंघात ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे उघड झाले आहे. याठिकाणी ठाकरेंच्या उमेदवाराला साथ न देता काँग्रेसने बंडखोर उमेदवारामागे ताकद उभी केली आहे. 

मुंबई/नागपूर - दुसऱ्याच्या काठीने विंचू मारावा एवढी शिवसेना कमकुवत झाली नाही. सुनील केदार यांनी रामटेकमध्ये गद्दारी केली आहे हे स्पष्ट आहे. मारूतीच्या बेंबीत लपलेला विंचू हे सुनील केदार आहेत अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते आणि पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख भास्कर जाधव यांनी काँग्रेस नेते सुनील केदार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

सुनील केदार यांनी रामटेकचे अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांच्या सभेत उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ही भूमिका घेतल्याचं म्हटलं. त्यावर भास्कर जाधव म्हणाले की, माझ्याकडे पूर्व विदर्भातील २८ जागांचे कार्यक्षेत्र आहे. त्या २८ जागांपैकी फक्त १ जागा आम्हाला मिळाली तिथेही काँग्रेसने त्यांचा बंडखोर उमेदवार उभा केला आहे. त्याच्या व्यासपीठावर तुम्ही जाता ही गद्दारी नाही?, तुम्ही उद्धव ठाकरेंना काय मदत करताय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

तसेच सुनील केदार पाहुण्यांच्या काठीने विंचू मारण्याइतपत आम्ही कमजोर नाही. सुनील केदार हा मारुतीच्या बेंबीत बसलेला विंचू आहे हे शिवसेनेने वेळीच ओळखावं. आज मारुतीच्या बेंबीत बोट घातल्यानंतर गार गार लागत असेल पण बाहेर आल्यानंतर प्रत्येकजण बोंबलत येतो कारण आत बेंबीत विंचू बसलेला असतो. तो नांगी मारतो. सुनील केदार हा मारुतीच्या बेंबीत बसलेला विंचू आहे. इतका विश्वासघात कुठल्याही मित्रपक्षाने आघाडीत करू नये. हा सरळ सरळ विश्वासघात आहे असा घणाघात भास्कर जाधव यांनी सुनील केदार यांच्यावर केला आहे.

रामटेकमध्ये काय स्थिती?

रामटेक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ठाकरेसेनेचे विशाल बरबटे हे अधिकृत उमेदवार आहेत. मात्र या मतदारसंघात काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यात काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री सुनील केदार हे जाहीरपणे बंडखोर उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे मविआतील धुसफूस उघड झाली आहे. काँग्रेसने राजेंद्र मुळक यांच्यावर कारवाई केली असली तरी स्थानिक नेते मविआ उमेदवाराचा प्रचार न करता बंडखोराला साथ देतानाचे चित्र पुढे आल्याने ठाकरे गट संतापला आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ramtek-acरामटेकvidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Bhaskar Jadhavभास्कर जाधवSunil Kedarसुनील केदारUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी