शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
2
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
3
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
4
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
5
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
6
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
7
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
8
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
9
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
10
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
11
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
12
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
13
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
14
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
15
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
16
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
17
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
18
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
19
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
20
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 22:16 IST

Maharashtra New CM : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहेत

Maharashtra Assembly Election 2024 : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील महायुतीने प्रचंड बहुमताने राज्याची सत्ता काबीज केली. पण, आता मुख्यमंत्रिपदावरुन महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदावर कायम ठेवावे, अशी शिंदेंच्या आमदाराची मागणी आहे. तर, भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याची मागणी भाजप आमदार करत आहेत. अशातच, एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुख्यमंत्रिपदावरुन महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. तर, एकनाथ शिंदेदेखील मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. तसेच, अमित शाह उद्या फडणवीसांच्या नावाची अधिकृत घोषणा करू शकतात. त्यामुळे शिंदे उद्या मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. शिंदेंची नाराजी दूर करण्याची जबाबदारी केंद्रातील भाजपच्या दोन ज्येष्ठ नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. आता ते शिंदेंची नाराजी दूर करण्यात कितपत यशस्वी होतात, हे पाहणे महत्वाचे आहे.

अजित पवारांचा भाजपला पाठिंबादुसरीकडे, मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला अजित पवारांचा पाठिंबा असल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजित पवारांनी दिल्लीतील भाजप हायकमांडला आपला निरोप कळवला आहे. महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री असेल, तर अजित पवार गटाला कोणतीही अडचण असणार नाही. अशा परिस्थितीत भाजप हायकमांड नेमका काय निर्णय घेणार, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार