शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विधान भवनात उद्धव ठाकरे समोर येताच फडणवीसांनी केला नमस्कार, तर सोबत असलेल्या शिंदेंनी... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 17:06 IST

Maharashtra Assembly Budget Session: महाराष्ट्राचा २०२५-२६ वर्षाचा अर्थसंकल्प आज वित्तमंत्री अजित पवार यांनी आज सभागृहात सादर केला. दरम्यान, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सभागृहातील कामकाज संपल्यावर विधानभवनाच्या परिसरात घडलेल्या घटनेची आता एकच चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्राचा २०२५-२६ वर्षाचा अर्थसंकल्प आज वित्तमंत्री अजित पवार यांनी आज सभागृहात सादर केला. दरम्यान, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सभागृहातील कामकाज संपल्यावर विधानभवनाच्या परिसरात घडलेल्या घटनेची आता एकच चर्चा सुरू आहे. त्याचं झालं असं की अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे  सभागृहाबाहेर येत होते. त्याचवेळी तिथे उभे असलेले ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची नजरानजर झाली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला. मात्र पाठून येत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी हळूच बाजू घेत उद्धव ठाकरेंच्या समोर येणं टाळलं. 

विधान भवनामध्ये घडलेल्या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून, त्यामध्ये अर्थसंकल्प आटोपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे जाताना दिसत आहेत. तर वाटेत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार मिलिंद नार्वेकर हे दिसत आहेत. 

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याजवळ आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबादास दानवेंशी हस्तांदोलन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना नमस्कार केला. यावेळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात थोडासा हास्यविनोदही झाला. मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या मागून येत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी समोर उद्धव ठाकरे असल्याचे दिसताच त्यांना न पाहिल्यासारखं करून तिथून हळूच बाजू मारली. तसेच उद्धव ठाकरेंकडे दुर्लक्ष करून तिथून निघून गेले. आता या घटनेची एकच चर्चा विधान भवानाच्या आवारात आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे