शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
5
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
6
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
7
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
8
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
9
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
10
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
12
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
13
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
14
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
15
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
16
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
17
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
18
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
19
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
20
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर यांना ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव’ पुरस्कार, राज्य सरकारचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 13:08 IST

Journalist Awards 2025: विजय बाविस्कर यांच्या ‘लोकमत’मधील ४० वर्षांच्या अविरत सेवेचा गौरव राज्य सरकारने यानिमित्ताने केला आहे.

मुंबई : ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर यांना राज्य सरकारचा ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. बाविस्कर यांच्या ‘लोकमत’मधील ४० वर्षांच्या अविरत सेवेचा गौरव राज्य सरकारने यानिमित्ताने केला आहे.

यासोबतच राही भिडे- २०१९, सुधीर पाठक- २०२०, भाऊ तोरसेकर- २०२१, बाळासाहेब जाधव- २०२३ या ज्येष्ठ पत्रकारांनाही जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. बाविस्कर यांना २०२२च्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

विजय बाविस्कर हे गेली ४० वर्षे ‘लोकमत’मध्ये कार्यरत असून  प्रशिक्षणार्थी  उपसंपादक ते समूह संपादक, असा त्यांचा प्रवास राहिला आहे. बाविस्कर यांना ‘लोकमत अचिव्हर्स अवॉर्ड्स २०२४-२५’अंतर्गत अलीकडेच ‘लोकमत जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

‘लोकमत’चा चौफेर गौरव : राज्य सरकारने पत्रकारांसाठीच्या २०१९, २०२०, २०२१, २०२२ आणि २०२३ मधील राज्य आणि विभागीय पुरस्कारांचीही मंगळवारी घोषणा केली. पुरस्कार विजेत्यांमध्ये ‘लोकमत’च्या विविध आवृत्त्यांमधील सहकाऱ्यांचा समावेश आहे. 

सर्वोत्कृष्ट अग्रलेखासाठीचा सुधाकरराव डोईफोडे पुरस्कार- २०२२ (५१ हजार रुपये) लोकमत नागपूरचे संपादक श्रीमंत माने यांना जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट छायाचित्रासाठीचा राज्यस्तरीय तोलाराम कुकरेजा पुरस्कार हा २०१९ व २०२२ साठी (प्रत्येकी ५१ हजार रुपये) लोकमत नाशिकचे छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट छायाचित्रकार राज्य पुरस्कार (२०२०) लोकमत नांदेडचे सचिन मोहिते (५१ हजार रुपये) यांना जाहीर झाला आहे.
 
विभागीय पुरस्कारांमध्ये दादासाहेब पोतनीस पुरस्कार लोकमत जळगावचे कुंदन पाटील, अनंतराव भालेराव पुरस्कार, लोकमत लातूरचे हरी मोकाशे, ग. गो. जाधव पुरस्कार लोकमत सिंधुदुर्गचे महेश सरनाईक, शि. म. परांजपे पुरस्कार, लोकमत रत्नागिरीचे अरुण आडिवरेकर व लोकनायक बापूजी अणे पुरस्कार- २०२२ लोकमत अमरावतीचे गजानन मोहोड, आचार्य अत्रे पुरस्कार लोकमत मुंबईचे सचिन लुंगसे, ग. त्र्यं. माडखोलकर पु्रस्कार लोकमत नागपूरचे योगेश पांडे व लोकमत चंद्रपूरचे राजेश बारसागडे (२०२३), ग. गो. जाधव पुरस्कार (२०१९) लोकमत कोल्हापूरचे भारत चव्हाण, दादासाहेब पोतनीस पुरस्कार लोकमत नंदुरबारचे मनोज शेलार यांचा समावेश आहे. 

तसेच तोलाराम कुकरेजा राज्यस्तरीय पुरस्कार- २०२३ छायाचित्रकार राजू ठाकरे यांना आणि लोकनायक बापूजी अणे विभागीय पुरस्कार अविनाश साबापुरे यांना अनुक्रमे ‘लोकमत’मधील त्यांचे छायाचित्र आणि वृत्तांकनासाठी जाहीर झाला आहे. 

टॅग्स :Journalistपत्रकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार