शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा दंगल: पुरवणी दोषारोपपत्रातही भिडे, एकबोटेंना वगळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 06:20 IST

फादर स्टॅन स्वामी, प्रो. आनंद तेलतुंबडे, प्रो. हनी बाबू, गौतम नवलखा, मिलिंद तेलतुंबडे आणि कबीर कला मंचाचे कार्यकर्ते ज्योती जगताप, सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांच्या नावांचा दोषारोपपत्रात समावेश आहे.

मुंबई : कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी आठ जणांविरुद्ध विशेष एनआयए न्यायालयात दुसरे पुरवणी दोषारोपपत्र सादर केले. 

फादर स्टॅन स्वामी, प्रो. आनंद तेलतुंबडे, प्रो. हनी बाबू, गौतम नवलखा, मिलिंद तेलतुंबडे आणि कबीर कला मंचाचे कार्यकर्ते ज्योती जगताप, सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांच्या नावांचा दोषारोपपत्रात समावेश आहे. मात्र, त्यात हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांच्या नावाचा समावेश नाही. एकबोटे आणि भिडे गुरुजी या दोघांवरही गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

फादर स्टॅन स्वामी (८३) हे सामाजिक कार्यकर्ते असून, आदिवासी लोकांसाठी काम करतात. त्यांना गुरुवारीच एनआयएने रांचीहून अटक केली. शुक्रवारी त्यांना २३ आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. गुरुवारी अटक केलेल्या स्टॅन स्वामीविरुद्धही दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती एनआयएच्या वकिलांनी दिली. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी एनआयएने पहिले दोषारोपपत्र नोव्हेंबर, २०१८ मध्ये विशेष न्यायालयात दाखल केले. त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते सुधीर ढवळे, अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, डॉ. शोमा सेन, प्रा. रोना विल्सन आणि महेश राऊत यांच्या नावाचा समावेश होता.
त्यानंतर, फेब्रुवारी, २०१९ मध्ये पहिले पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. कवी वरावरा राव, अ‍ॅड.सुधा भारद्वाज, सामाजिक कार्यकर्ते अरुण फेरारी आणि वेर्नोन गोन्साल्व्हिस यांच्या विरोधात हे दोषारोपपत्र होते.

फादर स्टॅन स्वामींना अटक
कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी फादर स्टॅन स्वामी (वय ८३) या जेसुइट धर्मगुरूना गुरुवारी एनआयएने अटक केली. आदिवासींसाठी काम करणारे स्वामी हे बंदी घातलेल्या सीपीआय माओअिस्ट या संघटनेचे सदस्य आहेत, असा दावा एनआयएने केला आहे. - सविस्तर वृत्त/ देश-परदेश

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीMilind Ekboteमिलिंद एकबोटे