शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आॅलवेज स्ट्रगल; घेणार का दखल?

By admin | Updated: July 17, 2014 01:11 IST

दरवर्षी पावसाळा येतो, ठिकठिकाणी पाणी साचते, नाल्या तुंबतात, रस्त्यांना तलावाचे स्वरूप येते. पुलाखाली साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प होते. खड्डे उघडे पडतात. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची एक दिवस

नेमेची येतो पावसाळा अन् दुर्दशाही : समस्येवर कायम तोडगा नाही
नागपूर : दरवर्षी पावसाळा येतो, ठिकठिकाणी पाणी साचते, नाल्या तुंबतात, रस्त्यांना तलावाचे स्वरूप येते. पुलाखाली साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प होते. खड्डे उघडे पडतात. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची एक दिवस चर्चा होते. पाणी ओसरले की स्थिती पुन्हा जैसे-थे. नागरी सुविधांसाठी महापालिकेकडे दरवर्षी कर भरणाऱ्या नागरिकांची या त्रासापासून कायमस्वरूपी सुटका व्हावी याकडे कोणीच लक्ष देत नाही. शहरात अनेक अशी ठिकाणे आहेत की तेथे दरवर्षी पाणी साचते. जबाबदार यंत्रणा परस्परांकडे बोट दाखवितात. पावसाळा संपला की पुढच्या पावसाळ्यापर्यंत याबाबत कोणी अवाक्षरही काढत नाही. निवडणुका आल्या की कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांच्या घोषणा केल्या जातात. आंतरराष्ट्रीय शहराची स्वप्ने दाखविली जातात. प्रत्यक्षात होत काहीच नाही.
वर्धामार्गाला जोडणाऱ्या वळण मार्गावर असणारा हा पूल दरवर्षी तेथे साचणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांच्या डोकेदुखीसाठी कारणीभूत ठरतो. पूर्वी येथे अपघात व्हायचे आता पावसाच्या पाण्याची समस्या आहे. थोडा जास्त पाऊस झाला तरी गुडघाभर पाणी येथे साचते व त्यामुळे पुलाखालून जाणारी वाहतूकच ठप्प पडते. पूल खोलगट भागात असल्याने अपघाताचाही धोका संभवतो.
शहरातील बाजारपेठेत असणारा हा जुना पूल आहे. जुन्या आणि नवीन नागपूरला हा पूल जोडतो. महापालिकेच्या फुटलेल्या जलवाहिनीतून वाहणाऱ्या पाण्यामुळे पुलाखाली बाराही महिने ओलावा असतो. पावसाळ्यात तर येथे तळे साचते. पुलाच्या आजूबाजूचा भाग खोलगट असल्याने हा परिसरच जलमय होतो. रेल्वे रुळावरून खाली येणारे तसेच इतर भागातून वाहत येणारे पाणी ही सर्वात मोठी समस्या आहे.
नागनदीला खेटून असणाऱ्या या पुलाची अवस्था पावसाळ्यात वेगळी राहात नाही. विशेष म्हणजे खोलगट भाग असल्याने येथे पावसाळ्यात अपघात होण्याची स्थिती आहे. अनेक वर्षांपासूनची ही समस्या आहे. नागनदीतील पाणी रस्त्यावर येते. याशिवाय उतार असल्याने इतर भागातील पाणी येथे गोळा होते. वाहने हाती घेऊन ढकलत नेण्यापलीकडे पावसाळ्यात येथे पर्याय उरत नाही.