शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आता हे काय नवीन... गौतमीचं खरं आडनाव पाटील नाही? आडनावावरुन नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 17:55 IST

गौतमीचे आडनाव पाटील नसल्याचा दावा करण्यात आला आहे. जाणून घ्या नेमके प्रकरण

Gautami Patil: आताच्या घडीला गौतमी पाटील हिची जोरदार चर्चा असल्याचे पाहायला मिळत आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि गोंधळ हे समीकरणच जणू झाले आहे. अलीकडेच एका कार्यक्रमात झालेल्या गोंधळावरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, ज्या गौतमी पाटीलची हवा तरुणाईमध्ये आहे, त्या गौतमीचे खरे आडनाव पाटील नाही, असा दावा करण्यात आला आहे. 

राज्यातील एकही असा जिल्हा नसेल जिथे गौतमीचा कार्यक्रम होत नसेल. अगदी लग्न समारंभ, वाढदिवसानिमित्तही गौतमीला बोलावले जाते. गौतमीच्या डान्सला, तिच्या कार्यक्रमांना विरोध होत असला तरी तिचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तिच्याविषयी छोट्यातली छोटी गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशातच गौतमीच्या आडनावाविषयी नवी माहिती समोर आली आहे. 

गौतमीचे खरे आडनाव पाटील नाही

गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून, चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. गौतमीने पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जराड पाटील यांनी दिला आहे. गौतमीच्या पाटील या आडनावावरून पुण्यात एक बैठक घेण्यात आली. त्यामुळे आता गौतमीच्या आडनावावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, एकेकाळी ऑर्केस्ट्रामध्ये अदाकारा म्हणून काम करणारी गौतमी सर्वांना मागे टाकून पुढे गेली आहे. एखाद्या अभिनेत्रीलाही नसेल अशी गौतमी पाटीलची क्रेझ महाराष्ट्रभर निर्माण झाली आहे. तिच्या कार्यक्रमांना संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी होत आहे. गौतमी जिथे जाईल तिथे तिच्या कार्यक्रमाला प्रचंड प्रमाणात गर्दी होते. एखाद्या सिनेमात काम करणाऱ्या नटीच्या तोडीस तोड गौतमीची कमाई आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गौतमीच्या कार्यक्रमांना ग्रामीण भागात अधिक डिमांड आहे. त्यातही तिने कोल्हापूर आणि पुण्यात सर्वाधिक कार्यक्रम केले आहेत. 

 

टॅग्स :Gautami Patilगौतमी पाटीलCelebrityसेलिब्रिटीPuneपुणे