शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 20:05 IST

जयंत पाटील हे राज्याच्या राजकारणातील अनुभवी नेते आहेत

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. राज्यातील अनुभवी नेते जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद सोडले. पण विधिमंडळ पक्षनेते या नात्याने जयंत पाटील आणि गटनेते म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी आज अधिवेशनानंतर पत्रकार परिषदेला संबोधित केले. या दरम्यान त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. याचदरम्यान, जयंत पाटील यांनी एका गोष्टीची खंत व्यक्त केली.

"विधिमंडळाच्या आवारात पाच ते दहा हजार लोक एकावेळी असतात. अनेक वेळा सभागृहात मी अधिकृतपणे हे मांडलेले आहे की पास देण्यावर मर्यादा असाव्यात. येथे चालायलाही जागा मिळत नाही. पण आम्ही वारंवार सांगूनही पास देण्याची व्यवस्था होताना दिसते. त्यामुळे विधानसभेतील सुरक्षारक्षकांनाही काहीवेळा कोण अधिकृत, कोण अनधिकृत कळत नाही. दुर्दैवाने सध्या काही आमदारांचा सहवास गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांबरोबर जास्त वाढलेला आहे. आमदारांचे जे समर्थक गुन्हेगार आहेत ते एवढे शिरजोर होतात की ते आमदारांच्या अगोदर आत येतात. विधिमंडळातील हे माझं ३६वे वर्ष आहे. पण एवढ्या ३६-३७ वर्षांमध्ये मी यापूर्वी कधीही अपप्रवृत्तीच्या व्यक्ती सभागृहात किंवा आवारात आलेल्या पाहिलेल्या नाहीत. अशा गोष्टी घडणे ," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.‌

जनसुरक्षा विधेयकावरही त्यांनी रोखठोक मत मांडले. "जनसुरक्षा विधेयकाच्या बाबतीत आम्ही संयुक्त समितीत असताना काही सुचना केल्या होत्या. त्यांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. पण ज्या दिवशी बिल सभागृहाच्या समोर आलं. त्यावेळी कमिट केलेला गोष्टी विधेयकात नव्हत्या. आम्ही सांगितलेले तीन ते चार मुद्दे त्यांनी मंजूर केले. पण आम्ही सांगितलेल्या बऱ्याच सूचना त्यांनी विधेयकात घेतल्या नाहीत. सरकारने एकाप्रकारे विरोधी पक्षाची फसवणूक केली असा आरोप त्यांनी केला. आज आम्ही राज्यपालांची भेट घेऊन जे मुद्दे संशयास्पद आहेत, ते राज्यपाल महोदयांना कळवले. तसेच हा विधेयकावर पुनर्विचार करण्याची विनंती केली," अशी माहिती त्यांनी दिली.

"महाविकास आघाडी सरकारच्या काळात, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही जी कर्जमाफी दिली, ती समिती नेमून केली नव्हती. अधिकारी नेमून वेळकाढूपणा करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणे आहे. सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यायचाच असेल तर ते २०२९ साली निवडणुकीच्या तोंडावर करतील. आता समिती नेमतोय इतकं सांगून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मते मिळवण्याचा सरकारचा डाव आहे," असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेसvidhan sabhaविधानसभा