शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 09:23 IST

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर नोंदणी महानिरीक्षकांनी कंपनीला संपूर्ण सात टक्के अर्थात २१ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरण्याची नोटीस बजावली

पुणे - मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी ३०० कोटी रुपयांची रक्कम दिली किंवा केव्हा देणार याबाबत स्पष्टता नाही. तसेच, व्यवहाराची अंमलबजावणी अर्थात मालमत्ता पत्रकात फेरफार झालेला नाही. मालकीचे हस्तांतरण झालेले नाही, त्यामुळे हा व्यवहारच अवैध ठरतो, असे सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणांत आदेश दिले आहेत. याच आदेशाचा आधार घेऊन या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला व्यवहार रद्द करण्यासाठीचे मुद्रांक शुल्कापोटीचे ४२ कोटी रुपये भरण्याची गरज भासणार नाही. उच्च न्यायालयात यासंदर्भात निर्णय होऊ शकतो, असे उच्चपदस्थ सनदी अधिकाऱ्यांचे मत आहे. 

४२ कोटी भरण्याची नोटीस  हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर नोंदणी महानिरीक्षकांनी कंपनीला संपूर्ण सात टक्के अर्थात २१ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरण्याची नोटीस बजावली. त्यानंतर या प्रकरणावरून राजकीय गदारोळ माजला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः हा व्यवहार रद्द करणार असल्याचे जाहीर केले. मात्र, व्यवहार रद्द करण्यापूर्वी दस्त नियमित करण्यासाठी सात टक्के अर्थात २१ कोटी आणि दस्त रद्द करण्यासाठी आणखी सात टक्के अर्थात २१ कोटी रुपये, असे ४२ कोटी रुपये भरण्याची कंपनीला नोटीस बजावली होती. 

आयटी पार्क उभारण्याच्या नावावर मिळवली सवलतपार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्राइजेस कंपनीचे भागधारक दिग्विजयसिंह पाटील यांनी कुल मुखत्यारधारक शीतल तेजवानी यांच्याकडून मुंढवा येथील बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ४० एकर जमिनीची खरेदी ३०० कोटी रुपयांमध्ये केली.  आयटी पार्क उभारण्यात येणार असल्याचे सांगून उद्योग संचालनालयाकडून इरादा पत्र घेण्यात आले. त्यामुळे मुद्रांक शुल्कात सवलत मिळावी यासाठी अर्ज करण्यात आला. दस्त खरेदीसाठी सात टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागते. त्यातील पाच टक्के शुल्काला यातून सवलत मिळते. दस्त खरेदी करताना संपूर्ण सात टक्के अर्थात २१ कोटी रुपयांची सवलत देण्यात आली. सहजिल्हा निबंधकांच्या लक्षात ही चूक आल्यानंतर त्यांनी वसुलीची नोटीस बजावली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : No Stamp Duty if Transaction Incomplete: 'Amedia' loophole to avoid penalty?

Web Summary : Amedia company avoids stamp duty on a disputed land deal, citing incomplete transaction and lack of ownership transfer, referencing Supreme Court precedents. Notice for 42 crore payment issued. The deal involved land purchased for an IT park with stamp duty concessions. The deal is currently under scrutiny.
टॅग्स :parth pawarपार्थ पवारAjit Pawarअजित पवार