शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयात थुंकाल तर...

By admin | Updated: July 25, 2014 01:12 IST

शासकीय रुग्णालयांमध्ये पान-खर्रा खाऊन थुंकणाऱ्या महाभागाची आता खैर नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास व धूम्रपान करणाऱ्यावर प्रतिबंध कलमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश

सार्वजनिक आरोग्य विभाग : प्रभावी अंमलबजावणीचे निर्देशनागपूर : शासकीय रुग्णालयांमध्ये पान-खर्रा खाऊन थुंकणाऱ्या महाभागाची आता खैर नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास व धूम्रपान करणाऱ्यावर प्रतिबंध कलमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहे. तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवाने दुष्परिणामांची सचित्र माहिती दर्शविणारे पोस्टर्स लावण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत.सध्या कोणत्याही शासकीय रुग्णालयात खर्रा, पान खाऊन भिंती रंगविणाऱ्या महाभागांची वानवा नाही. भिंतीचा कोपराच नाही तर आता खिडक्या, दारेही रंगलेले दिसतात. यामुळे सुटणाऱ्या दुर्गंधीमुळे धडधाकट माणूसही आजारी पडण्याचा धोका वाढतो. याला प्रतिबंध घालण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियमातील कलम ११६ मध्ये तरतूद आहे. परंतु याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. यासंदर्भात नुकतेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी परिपत्रक काढून प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश दिले आहे. त्यांच्यानुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर आणि थुंकण्यावर प्रतिबंध आहे आणि त्या माध्यमातून दंडात्मक कारवाई होत आहे. परंतु सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे आणि धूम्रपान करण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत नाही. थुंंकण्यामुळे विद्रुप झालेल्या भिंती पुन्हा पुन्हा रंगविण्यासाठी जनतेने कररूपाने दिलेला पैसा खर्च होत आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे पसरणारे विविध आजार आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी विचारात घेता, प्रतिबंध अंमलबजावणी प्रभाविणे राबविणे आवश्यक आहे. तसेच आरोग्य विभागाच्या कार्यालयांमध्ये थुंकण्यास व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करण्यास मनाई आहे, अशा आशयाचे फलक आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवनाच्या दुष्परिणामांची माहिती दर्शविणारे फलक लावण्याच्या सूचनाही केल्या आहेत. (प्रतिनिधी)