शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

"असेल हिंमत तर एक एकट्याने लढा.." ; चंद्रकांत पाटलांचे महाविकास आघाडीला खुले आव्हान

By दीपक अविनाश कुलकर्णी | Updated: December 4, 2020 14:43 IST

तरीदेखील भाजपने महाविकास आघाडीला कडवी झुंज दिली...

पुणे: राज्यातील महाविकास आघाडीने विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुक निकालांमध्ये जोरदार मुसंडी मारत भाजपला जोरदार धक्का देत घवघवीत यश मिळवले आहे. तर दुसरीकडे पुणे, नागपूर या बालेकिल्ल्यांसह औरंगाबादमध्येही भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. आता या धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपला लक्ष्य केले जात आहे. मात्र आता भाजपकडून देखील महाविकास आघाडीला प्रत्युत्तर देताना आव्हान देण्यात आले आहे. 

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांचे निकाल समोर येऊ लागले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपची हॅट्ट्रिकची संधी हुकली असून या ठिकाणी महाविकास आघाडीचे अरुण लाड यांनी जवळपास ४८ हजार मताधिक्याने भाजप उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव करत विजयश्री खेचून आणली आहे. तसेच नागपूरमध्ये संदीप जोशी यांच्यावर मात करून काँग्रेसचे अभिजीत वंजारी हे विजयी झाले आहे. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सतीश चव्हाण यांनी विजयी परंपरा कायम राखली आहे. याच धर्तीवर महाविकास आघाडीच्या प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार, अजित पवार, आणि जयंत पाटील,रोहित पवार यांनी भाजपच्या नेत्यांना जोरदार टोला लगावला होता. त्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे. 

पाटील म्हणाले, पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्रितपणे आमच्याशी लढत दिली. यामुळे या निकालांमध्ये काहीही धक्कादायक असे घडलेले नाही. हे होणारच होते. परंतू, तरीदेखील भाजपने महाविकास आघाडीला कडवी झुंज देत चांगली लढत दिली.  निकालांमध्ये मुद्दा असा की शिवसेनेला काय मिळालं याचा त्यांनी विचार करायला हवा. त्यांची अमरावतीची जागा गेली. याउलट या निकालांमध्ये भाजपला निदान धुळे नंदुरबार मतदारसंघात फक्त विजय मिळविता आला. मात्र शिवसेनेचे काय ? शिवसेनेने अमरावतीची एकमेव जग देखील गमावली. पण या निवडणुकीत सर्वाधिक फायदा झाला तो राष्ट्रवादी काँग्रेसचा. त्यांनी पुणे, औरंगाबाद व अप्रत्यक्षरीत्या अमरावती शिक्षक मतदार संघात विजय प्राप्त केला. माझे या तिघांना पण थेट आव्हान आहे की, हिंमत असेल तर त्यांनी एकट्याने आमचा सामना करावा. मात्र त्या तीन पक्षांमध्ये हिंमत नसल्याचे स्पष्ट आहे. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांना लगावला होता खोचक टोला.. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवली तर महाविकास आघाडीकडून त्यांचा पराभव होईल असा खोचक टोला राष्ट्रवादीचे नेते व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. 

टॅग्स :PuneपुणेState Governmentराज्य सरकारPoliticsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस