"मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान पद असते, तर तातडीचा शपथविधी मान्य होता पण...", शरद पवारांच्या आमदाराने कुणाला सुनावले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 15:23 IST2026-01-31T15:21:03+5:302026-01-31T15:23:27+5:30

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर उपमुख्यमंत्री पदी सुनेत्रा पवार यांचे नाव निश्चित झाले आहे. त्यांची गटनेते पदी निवड करण्यात आली. घाईत होत असलेल्या या राजकीय घडामोडींबद्दल आमदार जानकर यांनी नाराजी व्यक्त केली. 

"If there was a Chief Minister or Prime Minister post, an urgent oath-taking ceremony would have been acceptable, but...", Sharad Pawar's MLA told whom? | "मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान पद असते, तर तातडीचा शपथविधी मान्य होता पण...", शरद पवारांच्या आमदाराने कुणाला सुनावले?

"मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान पद असते, तर तातडीचा शपथविधी मान्य होता पण...", शरद पवारांच्या आमदाराने कुणाला सुनावले?

अजित पवारांच्या आकस्मिक निधनामुळे उपमुख्यमंत्री पद रिक्त झाले. या पदाची सूत्रे सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय झाला आहे. सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. अजित पवारांच्या मृत्युला दोन दिवस उलटताच यासंदर्भातील हालचाली सुरू झाल्याने यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवरच टीका केली आहे. 

सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले. त्यानंतर आमदार उत्तम जानकर यांनी यावरून भाजपाला लक्ष्य केले.

"हे काही योग्य झालेले नाही", जानकर नाराज

"कोणाला तरी लाभ मिळवून देण्यासाठी इतक्या तातडीने हा शपथविधी केला जात आहे. या सहानुभूतीचा फायदा उठवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. अजून दुःख संपलेले नाही. अशा परिस्थितीत शपथविधी करणे आणि तेही शरद पवारांना डावलून, हे काही योग्य झालेले नाही", अशी टीका आमदार उत्तम जानकर यांनी केली आहे. 

मुख्यमंत्री, पंतप्रधान गेले असते, तर...

"या परिस्थितीत शरद पवार आणि सर्व कुटुंबाने एकत्रित येऊन हा निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र, झालेला निर्णय योग्य नाही. हे किती दिवस चालेल हे सांगता येत नाही. उपमुख्यमंत्री पद हे काही घटनात्मक पद नाही. जर मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान गेले असते, तर तातडीने शपथविधी मान्य होता", अशी भूमिका आमदार उत्तम जानकर यांनी मांडली आहे.   

"ज्या पद्धतीने हा शपथविधी होतोय, हे नक्कीच कोणाला तरी फायदा मिळवून देण्यासाठी सुरू आहे", असेही आमदार जानकर म्हणाले. 

सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री 

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तयार केले. त्यानंतर शनिवारी मुंबईत वेगवान घडामोडी घडल्या. दुपारी त्यांची गटनेते पदी निवड करण्यात आली. सायंकाळी त्यांचा शपथविधी लोकभवनात (पूर्वीचे राजभवन) पार पडणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत.

Web Title : अजित पवार के उत्तराधिकारी के लिए शरद पवार गुट ने त्वरित शपथ पर सवाल उठाए।

Web Summary : अजित पवार के निधन के बाद सुनेत्रा पवार को उपमुख्यमंत्री के रूप में तेजी से नियुक्त करने पर एनसीपी (शरद पवार) के विधायक उत्तम जानकर ने आलोचना की। उन्होंने जल्दबाजी पर सवाल उठाया और राजनीतिक अवसरवाद का सुझाव दिया, साथ ही शरद पवार के साथ परामर्श की कमी को उजागर किया। उन्होंने यह भी सुझाव दिया कि यह कार्रवाई किसी को लाभ पहुंचाने के लिए की जा रही है।

Web Title : Sharad Pawar faction criticizes swift oath for Ajit Pawar's replacement.

Web Summary : NCP (Sharad Pawar) MLA Uttam Jankar criticizes the rapid appointment of Sunetra Pawar as Deputy CM following Ajit Pawar's passing. He questions the urgency and suggests political opportunism, highlighting a lack of consultation with Sharad Pawar. He also suggests that this action is being done to benefit someone.