शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

"मी माझ्या अटकेची वाट पाहतोय...", अनिल देशमुखांची पोस्ट, फडणवीसांवर हल्लाबोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 11:08 IST

Anil Deshmukh : जुने प्रकरण उकरून काढत रेड टाकून मला अट‍क करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करीत आहेत, असा आरोप अनिल देशमुख यांनी केले आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने एका प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजवर हल्लाबोल केला आहे. जुने प्रकरण उकरून काढत रेड टाकून मला अट‍क करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करीत आहेत, असा आरोप अनिल देशमुख यांनी केले आहे. तसेच, आपण अटकेची वाट पाहत असल्याचे म्हणत अनिल देशमुख यांनी प्रतिआव्हान दिले आहे.

यासंदर्भात अनिल देशमुख यांनी एक्सवर पोस्ट लिहिली आहे. यामध्ये, देवेंद्र फडणवीस यांनी ४ वर्षापूर्वीची घटना उकरून काढीत माझ्या विरुद्ध दिल्लीच्या मदतीने सीबीआयकडून एफआयआर दाखल केली आहे. ४ वर्षांपूर्वी मी गृहमंत्री असताना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजपाचे नेते गिरीष महाराज यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, हा माझ्यावर आरोप आहे, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. 

याचबरोबर, माझ्या माहितीनुसार, माझ्यावर रेड टाकून मला अट‍क करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करीत आहेत, असा गंभीर आरोप करत ज्या देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या मदतीने ईडी-सीबीआयला हाताशी धरुण महाराष्ट्राचे राजकारण अतिशय खालच्या स्तरावर आणले, त्यांना मी सांगू इच्छितो की देवेंद्र फडणवीस मी माझ्या अटकेची वाट पाहत आहे, असे पोस्टद्वारे अनिल देशमुख सांगत  देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, कथित १०० कोटी वसुली प्रकरणी चौकशीचा ससेमिरा सुरू असतानाच आता अनिल देशमुखांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. यातच, राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच सीबीआयने गुन्हा दाखल केल्याने अनिल देशमुख यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधीच देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस