'मी आज बेळगावात येतोय, पाहू'; संजय राऊतांचा बेळगाव पोलिसांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 09:28 IST2020-01-18T00:23:42+5:302020-01-18T09:28:04+5:30

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-येड्रावकर यांना शुक्रवारी सकाळी बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी त्यांना सीमेबाहेर सोडले. दरम्यान या घटनेचा महाराष्ट्र एकीकरण समितीने निषेध केला आहे.

'I am coming to Belgaum today, lets see'; Sanjay Raut's alert to Belgaum police | 'मी आज बेळगावात येतोय, पाहू'; संजय राऊतांचा बेळगाव पोलिसांना इशारा

'मी आज बेळगावात येतोय, पाहू'; संजय राऊतांचा बेळगाव पोलिसांना इशारा

मुंबई : सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगाव येथे गेलेले आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-येड्रावकर यांना शुक्रवारी सकाळी बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. यावर संजय राऊतांनी निषेध व्यक्त करताना "मी उद्या (शनिवार) बेळगावात येत आहे, बघू!" असे ट्विट केले आहे. यामुळे आज बेळगावमध्ये पुन्हा वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
    
भाषावार प्रांत रचनेची घोषणा झाल्यावर सीमाभाग कर्नाटकात डांबला गेल्यामुळे सीमाभागात संतापाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी १७ जानेवारी १९५६ यादिवशी झालेल्या आंदोलनात बेळगाव आणि निपाणी येथे पोलिसांच्या गोळीबारात पाच जणांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. यामध्ये निपाणी येथील कमलाबाई मोहिते, बेळगाव येथील पैलवान मारुती बेन्नाळकर यांच्यासह अन्य तिघांचा समावेश होता. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हुतात्मा चौकात दरवर्षी या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येते.

बेळगावातील हुतात्मा चौकात महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना यांच्यातर्फे हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पचक्र, पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अभिवादन केल्यानंतर कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून फेरी काढली. यावेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त होता.

यासाठी गेलेल्या आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना शुक्रवारी सकाळी बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी त्यांना सीमेबाहेर सोडले. दरम्यान या घटनेचा महाराष्ट्र एकीकरण समितीने निषेध केला आहे. यावर महाराष्ट्राचे मंत्री राजेंद्र येड्रावकर यांना कर्नाटक पोलीसांची धक्काबुक्की केली. हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्या पासून रोखले. महाराष्ट्र भाजपा या कर्नाटकी दहशतवादाचा साधा निषेध तरी करेल काय? असा प्रश्न महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना विचारला आहे. तसेच मी उद्या बेळगावला जात आहे. 
पाहू काय घडतंय, असे म्हणत इशारा दिला आहे.

शिवसेनेचे सरकार आल्यानंतर बेळगावमध्ये तणाव निर्माण झाला होता. कनसेच्या नेत्याने म ए समितीच्या नेत्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, अशी धमकी दिली होती. यावरून वातावरण चिघळले होते. कोल्हापूरमध्ये येडीयुरापा तर बेळगावमध्ये उद्धव ठाकरेंचे पुतळे जाळण्यात आले होते. बस सेवाही बंद करण्यात आली होती. यामुळे सीमारेषेवर जात शिवसेनेने आंदोलन केले होते.

Web Title: 'I am coming to Belgaum today, lets see'; Sanjay Raut's alert to Belgaum police