मुंबई : एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या गतिमंद मुलीवर घरगड्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पश्चिम उपनगरात घडली. आई-वडील दोघेही व्यवसायाच्या व्यापात अत्यंत व्यग्र असल्यामुळे दिवसभर घराबाहेर असत. त्यामुळे विश्वासाने त्यांनी आपल्या गतिमंद मुलीची देखभाल करण्यासाठी घरगड्याला नेमले होते. मात्र मालक सतत घराबाहेर असल्याची संधी साधत त्यानेच त्यांचा विश्वासघात केला.
बाबूलाल डोडीयार (२४) असे या नराधम घरगड्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला मध्यरात्री अडीचच्या सुमारास अटक केली. न्यायालयाने त्याला २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १९ वर्षांच्या या गतिमंद तरुणीवर नायर रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते. तसेच ती शिकवणीला जात असे. तेथील शिक्षकांना या मुलीने बाबूलालचे कारनामे तुटक तुटक सांगितले. शिक्षकांनी ही बाब तात्काळ व्यावसायिक पालकांच्या कानावर घातले. हा प्रकार ऐकून चिंतेत पडलेल्या पालकांनी घरी मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने मुलीकडे चौकशी केली. त्यात तिने बाबूलालने बलात्कार केल्याचे स्पष्ट सांगितले. त्यानंतर पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार बाबूलालला गजाआड करण्यात आले. दरम्यान, जेजे रूग्णालयात मुलीच्या वैद्यकीय चाचण्या पार पडल्या असून डॉक्टरांचा अहवाल प्राप्त झालेला नाही, असे पोलीस उपायुक्त बालसिंग राजपूत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गतिमंद तरूणीवर घरगड्याचा बलात्कार
By admin | Updated: July 17, 2014 02:36 IST
एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या गतिमंद मुलीवर घरगड्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पश्चिम उपनगरात घडली.
गतिमंद तरूणीवर घरगड्याचा बलात्कार
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}