शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना, नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 10:02 IST

कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रामार्फत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रामार्फत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच भारतीय हवामान विभागाकडून  पुणे घाट परिसरात शनिवारी मध्यरात्रीपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (२० जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) रत्नागिरी जिल्ह्यात ४१.७ मिमी पाऊस झाला आहे. तर ठाणे जिल्ह्यात ४१.६ मिमी, पालघर ४१.६ मिमी, रायगड जिल्ह्यात ४०.१ मिमी  आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात ३१.७ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. अनेक भागात प्रतीक्षा कायम आहे.

गोदावरीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटलाअहिल्यानगर येथील कोपरगाव तालुक्यातील वारी येथील गोदावरीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गुरुवारी रात्री नांदूर मधमेश्वर धरणातून ३० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आला आहे.  

उजनीतून भीमा नदीत पाणी उजनी धरणात दौंड येथून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात लक्षणीय वाढ झाली असून, ७० हजार क्युसेकपर्यंत विसर्ग वाढला. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उजनीची पातळी स्थिर ठेवण्यासाठी उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

चंद्रभागेत तरुण, कालव्यात महिला बुडाली चंद्रभागेत पोहण्यासाठी गेलेल्या शुभम ज्ञानेश्वर पावले (२७, रा. अलतगे, बेळगाव) या भाविकाचा गुरुवारी पहाटे बुडून मृत्यू झाला आहे. तर तिलारी धरणाच्या कालव्यात पडल्याने कसई-गावठणवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील सुलोचना प्रभाकर साळकर (७५) यांचा मृत्यू झाला.

रत्नागिरी जिल्ह्यात पूर; अतिवृष्टीमुळे पाणीच पाणीरत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खेड, दापोली नगरपालिका हद्दीमध्ये पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली. बोरघर वावे तर्फे नातू चिंचवली रस्त्यावरच्या पुलावर पाणी गेल्याने रस्ता बंद होता. वनोशी अंगणवाडी पन्हाळे फणसूर रस्त्याच्या मधील पुलावर पुराचे पाणी आल्याने रस्ता बंद केला होता.  चिंचगर कोरेगाव भैरवी रस्त्यावरील पुलावर पुराचे पाणी आल्याने रस्ता बंद केला होता. सद्यस्थितीत वाहतूक सुरळीत चालू आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ (गुहागर- चिपळूण-विजापूर) सोनपात्र वळणाजवळ दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक बंद करून दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.  

प्रकल्पांमध्ये वाढला साठा राज्य आपत्कालीन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर आहे. पुणे विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे खडकवासला धरण मुठा नदी १५,०९२ क्युसेक, बंडगार्डन बंधारा पुणे-२४,४१६ क्युसेक, भीमा नदी दौंड पूल विसर्ग १०,८३३ क्युसेक, घोड नदी घोड धरण  ४,००० क्युसेक, कण्हेर धरण सातारा ५०० क्युसेक, वेण्णा नदी-१,००० क्युसेक विसर्ग सुरू असून नदी किनाऱ्यालगत गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदी नांदूर मधमेश्वर धरणातून  २२,३४५ क्युसेक, सीना नदी - सीना धरणातून  २८९ क्युसेक विसर्ग सुरू आहे.

टॅग्स :weatherहवामान अंदाजMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊसHigh Alertहाय अलर्ट