शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 21:43 IST

Bacchu kadu Devendra Fadnavis Meeting: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बच्चू कडूंसह शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत विविध मागण्यांवर चर्चा झाली.

Bacchu Kadu Devendra Fadnavis: शेतकरी कर्जमाफीसह वेगवेगळ्या मागण्यासंदर्भात बच्चू कडूंसहशेतकरी नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांची कर्जाच्या दृष्टचक्रातून कायम स्वरुपी सुटका करण्याच्या दृष्टीने सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. सरकारने नऊ सदस्यीय उच्चाधिकार समिती नियुक्ती केली असून, त्यासंदर्भातील शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.

बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी महाएल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची दखल घेत राज्य सरकारने आंदोलक शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी मुंबईला बोलावले होते. सायंकाळी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बच्चू कडू, राज शेट्टी, अजित नवले, महादेव जानकर, शेतकरी नेते रविकांत तुपकर, वामनराव चटप या नेत्यांसह शिष्टमंडळासोबत बैठक झाली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संबंधित मंत्री आणि अधिकारी हजर होते. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर सरकारने शेतकऱ्यांच्या कायमस्वरुपी कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. ही समिती सखोल अभ्यास करून राज्य सरकारला शिफारसशी करणार आहे. 

शासन निर्णयात काय म्हटले आहे?   

महाराष्ट्रातील शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहेत. तथापि, अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक वेळा पिकांचे नुकसान होते.  पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. त्यामुळे बाधित शेतकरी शेती कर्जाची मुदतीत परतफेड करु शकत नाहीत. असे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकांकडून नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही.

शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी यापूर्वी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, २०१७, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०१९ व महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना, २०१९ जाहिर करुन शेतकऱ्यांना वेळोवेळी भरीव मदत केली आहे.

राज्यातील शेतकरी कर्जमाफीनंतरही वारंवार थकीत कर्जाच्या दुष्टचक्रामध्ये अडकत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून (debt trap) कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

प्रवीण परदेशी उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष

या दृष्टीने शासनास अभ्यासपूर्ण शिफारसी सादर करण्यासाठी प्रवीण परदेशी, मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, मित्र यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून त्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून (debt trap) कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत अभ्यासपूर्ण शिफारसी शासनास सादर करण्यासाठी प्रवीण परदेशी, मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, मित्र यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे उच्चाधिकार समिती गठीत करण्यात येत आहे.

समितीने शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून त्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून (debt trap) सोडवणूक करण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने अभ्यास करुन त्याबाबतचा अहवाल शासनास ६ महिन्यात सादर करावा.

सदर समितीमध्ये आवश्यकतेनुसार अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांना / तज्ञ व्यक्तींना बैठकीस निमंत्रित करण्याची समितीचे अध्यक्ष यांना मुभा राहील. अशा अधिकाऱ्यांना/तज्ञ व्यक्तींना नियमानुसार प्रवासभत्ता व इतर भत्ते अनुज्ञेय राहतील.

English
हिंदी सारांश
Web Title : High-Powered Committee Formed for Maharashtra Farmers' Debt Relief: Key Decision

Web Summary : Maharashtra government establishes a high-powered committee to recommend lasting solutions for farmer debt relief. The decision followed discussions between Chief Minister Fadnavis and farmer leaders like Bacchu Kadu, aiming to break the cycle of debt and improve farmers' lives.
टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूBachhu Kaduबच्चू कडूDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार