शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी ; मराठवाड्यात १९ सप्टेंबरला पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 1:12 PM

देशात सध्या मॉन्सून पश्चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटकाच्या किनारपट्टी भागात सक्रीय आहे़. 

पुणे : मध्य प्रदेशापासून राजस्थानपर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सध्या पश्चिम भारतात बºयाच भागात पाऊस पडत आहे़. गेल्या २४ तासात कोकण काही ठिकाणी अतिवृष्टी झाली़ कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. मराठवाड्यात येत्या १९ सप्टेंबर रोजी अनेक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़. देशात सध्या मॉन्सून पश्चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटकाच्या किनारपट्टी भागात सक्रीय आहे़. कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला़ खालापूर, उल्हासनगर ६०, कर्जत, सुधागड पाली ५० मिमी पाऊस झाला़ याशिवाय अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला़ मध्य महाराष्ट्रात गगनबावडा, हरसुल, महाबळेश्वर ५०, इगतपुरी, ओझर, ओझरखेडत्त, पन्हाळा, राधानगरी, साक्री, वडगाव मावळ ३० मिमी पाऊस पडला़ मराठवाड्यात बीड, निलंगा ३०, चाकूर, लोहारा, वडावणी २०, अंबड, गंगाखेड, हिमायतनगर, कन्नड, खुल्दाबाद, परळी वैजनाथ, सेनगाव १० मिमी पाऊस पडला़. विदर्भात चिखलदरा २०, धारणी, मुलचेरा १० मिमी पावसाची नोंद झाली होती़.  रविवारी दिवसभरात महाबळेश्वर १७, मुंबई १०, अलिबाग २४, पणजी १३, डहाणु ११ मिमी पावसाची नोंद झाली आहे़. 

येत्या २४ तासात कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. इशारा : १६ व १७ सप्टेंबर रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता़ १८ सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. ़़़़़पुणे शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून अधून मधून सरी येत असतात़. पुढील पाच दिवस शहरात मध्यम ते हलका पाऊस होण्याची शक्यता आहे़. ़़़़़़गेल्या २४ तासात झालेला पाऊस पालघर २४०, भिवंडी १५०, डहाणु, माथेरान १४०, दावडी ११०, तलासरी, वसई, डुंगरवाडी, भिवपुरी १००, भिरा, ताम्हिणी ९०, कल्याण, शिरगाव ८०, अंबरनाथ, म्हसळा, विक्रमगड, पेठ, वळवण ७० मिमी पावसाची नोंद झाली होती़. ़़़़़़़़पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात १६, १७ व १८ सप्टेंबरला मुसळधार पावसाची शक्यता आहे़. १९ सप्टेंबरला पालघर, रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़. नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात १९ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे़. मराठवाड्यातील परभणी, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी १९ सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानFarmerशेतकरीfloodपूरGovernmentसरकार