शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
6
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
7
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
8
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
9
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
10
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
11
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
12
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
13
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
14
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
15
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
16
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
17
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
18
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
19
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
20
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई

द्राक्ष निर्यात १० हजार टनांनी घटली ; उत्पादनात ३० ते ४० टक्के घट 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 10:00 PM

राज्यात ३० ते ३५ लाख टन द्राक्ष उत्पादन गेल्यावर्षी याच काळामधे अडीच हजार कंटेनर (१ कंटेनर १५ टन) द्राक्षाची निर्यात

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय बाजारात किलोमागे २०उत्पादन घटल्याने चांगल्या प्रतीच्या मालाला भाव गेल्यावर्षी याच काळामधे अडीच हजार कंटेनर (१ कंटेनर १५ टन) द्राक्षाची निर्यात युरोपीयन देशामधे काळ्या व लाल द्राक्षाला किलोमागे ८५ ते शंभर रुपये

पुणे : लांबलेला पाऊस आणि अतिवृष्टीमुळे द्राक्ष पिकाला चांगलाच फटका बसला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत निर्यातीमधे १० हजार ५०० टनांनी घट झाल्याची माहिती द्राक्ष उत्पादकांनी दिली. एकूण निर्यात सरासरीपेक्षा तीस टक्क्यांनी घटेल असा अंदाज द्राक्ष उत्पादकांकडून वर्तविण्यात येत आहे. उत्पादन घटल्याने चांगल्या प्रतीच्या मालाला भाव मिळत आहे. याबाबत द्राक्ष उत्पादक विलास शिंदे म्हणाले, द्राक्ष हंगामाला जवळपास ४० टक्क्यांपर्यंत फटका बसेल, असे सांगण्यात येत होते. त्या प्रमाणे उत्पादनाला फटका बसला आहे. तसेच, आत्तापर्यंत उष्मा वाढला नसल्याने देशांतर्गत मागणी देखील बेताचीच आहे. आता उष्मा वाढू लागल्याने देशांतर्गत मागणीत वाढ होईल. गेल्यावर्षी याच काळामधे अडीच हजार कंटेनर (१ कंटेनर १५ टन) द्राक्षाची निर्यात झाली होती. यंता ती १८०० कंटेनर पर्यंत खाली आली आहे. नाशिक पट्ट्यामधे १५ लाख टन द्राक्षाचे उत्पादन होते. त्या पैकी १२ ते १५ टक्के मालाची निर्यात होते. राज्यात ३० ते ३५ लाख टन द्राक्ष उत्पादन होते. सरासरी १० टक्के मालाची निर्यात होते. देशांतर्गत खप जास्त होतो. उत्पादन घटल्याने यंदाच्या हंगामाला २५ ते ३५ टक्के फटका बसेल, असा अंदाज असल्याचे शिंदे म्हणाले. --युरोपात शंभर रुपये किलोला भावयुरोपीयन देशामधे काळ्या व लाल द्राक्षाला ८५ ते शंभर रुपये किलोमागे मिळत आहे. तर, पांढºया द्राक्षाला ८० ते ९० रुपये भाव मिळत आहे. रशिया आणि दुबईमधे पांढºया द्राक्षाला ५० ते ६० रुपये भाव आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामधे गेल्यावर्षीपेक्षा किलोमागे २० ते २५ रुपये अधिक भाव मिळत आहे. देशांतर्गत बाजारात द्राक्षाला किलोमागे ३५ ते ४५ रुपये भाव मिळत असल्याचे द्राक्ष उत्पादकांनी सांगितले. --ज्यांची द्राक्षे १५ जून ते सप्टेंबर या कालावधीत तोडणीस आली होती, त्यांना अधिक फटका बसला आहे. आॅक्टोबरमधे छाटणी झालेली द्राक्षे चांगली आहेत. देशांतर्गत बाजारपेठच मोठी आहे. देशांतर्गत बाजारात २५ ते ५० रुपये किलोला भाव मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रतवारीनुसार ८० ते १२० रुपये भाव आहे. गेल्यावर्षी याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारात द्राक्षाचा प्रतीकिलो ७०ते७५ रुपये भाव होता. - कैलास भोसले, कोषाध्यक्ष, राज्य द्राक्ष बागाईतदार संघ

टॅग्स :PuneपुणेfruitsफळेFarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्डagricultureशेती