शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉ'क; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
2
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
3
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
4
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
5
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
6
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
7
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
8
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
9
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
10
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
11
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
12
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
13
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
14
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
15
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
16
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
17
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
18
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
19
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
20
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांचं आमदारांना मोठ्ठं गिफ्ट; सर्व सदस्यांकडून बाक वाजवून आनंद व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 17:03 IST

आमदारांना वाहन खरेदी करण्यासाठी मिळणार ३० लाख; सरकार व्याज फेडणार

ठळक मुद्देआमदारांना वाहन खरेदी करण्यासाठी मिळणाऱ्या रकमेत तिप्पट वाढवाहन खरेदीसाठी मिळणारी रक्कम १० लाखांवरुन ३० लाखांंवरअजित पवारांच्या घोषणेचं सर्वपक्षीय आमदारांकडून स्वागत

मुंबई: आमदार निधीत १ कोटींची वाढ करण्याची घोषणा केल्यानंतर आता अर्थमंत्री अजित पवारांनीआमदारांसाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. नव्या घोषणेनुसार गाडी खरेदीसाठी प्रत्येक आमदाराला ३० लाख रुपये मिळणार आहेत. गाडीसाठी सरकारनं दिलेली रक्कम (मुद्दल) आमदारांना फेडावी लागेल. तर त्यावरील व्याज सरकार भरेल. अजित पवारांच्या या घोषणेनंतर आमदारांनी व्यक्त केला. पवारांच्या घोषणेचं आमदारांनी बाक वाजवून स्वागत केलं. विरोधकांनी अर्थसंकल्पीय भाषणावर नोंदवलेल्या आक्षेपांना आज अजित पवारांनी विधानसभेत उत्तरं दिली. त्यावेळी त्यांनी आमदारांच्या वाहनासाठी सरकार मदत करणार असल्याची घोषणा केली. आमदारांना गाडी खरेदी करण्यासाठी सध्या १० लाख रुपये कर्जाऊ मिळतात. ही रक्कम आता ३० रुपये करण्यात आली आहे, असं अजित पवारांनी जाहीर केलं. यानंतर सर्वच आमदारांनी बाक वाजवून पवारांच्या निर्णयाचं स्वागत केलं. ज्या आमदारांची आर्थिक परिस्थिती चांगली असते, त्यांना १० लाखांमध्ये गाडी घेणं शक्य होतं. मात्र, काही आमदार पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यांच्यासाठी नवीन गाडी घेणं कठीण होत असल्यामुळे हा निधी १० लाखांवरून ३० लाख करण्याचा निर्णय घेतल्याचं ते पुढे म्हणाले. याआधी अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात आमदार निधी २ कोटींवरुन ३ कोटी रुपये करण्याची घोषणा केली. यानंतर आता आमदारांना वाहन खरेदी करण्यासाठी मिळणारा निधीदेखील थेट तिपटीनं वाढवण्यात आला आहे. त्यामुळे या अधिवेशनात आमदारांसाठी पवार यांनी डबल धमाका केला आहे. अजित पवारांच्या या दोन्ही घोषणांनंतर आमदारांनी बाक वाजवून स्वागत केलं. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMLAआमदार