शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

शासनाला उत्तरासाठी शेवटची संधी

By admin | Updated: September 29, 2014 01:03 IST

‘महाराष्ट्र गुंठेवारी डेव्हलपमेंट रेग्युलेशन’ कायद्यातील कलम ५ (१) च्या वैधतेसंदर्भात उत्तर सादर करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला शेवटची संधी

हायकोर्ट : क्रीडांगणांवरील अतिक्रमणाचे प्रकरणनागपूर : ‘महाराष्ट्र गुंठेवारी डेव्हलपमेंट रेग्युलेशन’ कायद्यातील कलम ५ (१) च्या वैधतेसंदर्भात उत्तर सादर करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला शेवटची संधी म्हणून २९ आॅक्टोबरपर्यंत वेळ दिला आहे. या मुद्यावर राज्याच्या महाधिवक्त्याने न्यायालयात बाजू मांडणे आवश्यक आहे. आज, बुधवारी न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व पुखराज बोरा यांच्यासमक्ष सुनावणी झाली. खेळाची मैदाने नाहिशी होत असल्याच्या वृत्ताची दखल घेऊन न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर यांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अ‍ॅड. खुबाळकर यांनी याचिकेची व्याप्ती वाढवून ‘महाराष्ट्र गुंठेवारी डेव्हलपमेंट रेग्युलेशन’ कायद्यातील कलम ५ (१) च्या वैधतेला आव्हान दिले आहे. या कलमानुसार नागपूर सुधार प्रन्यासने अनेक क्रीडांगणांवरील अनधिकृत बांधकामे नियमित केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.नागपूरचा पहिला विकास आराखडा ३० जुलै १९७६, तर सुधारित विकास आराखडा १० सप्टेंबर २००१ पासून लागू झाला. त्यात एकूण १६३ ठिकाणी खेळाच्या मैदानासाठी आरक्षण आहे. यापैकी ४० मैदाने मनपाच्या अधिकारक्षेत्राखाली येतात.यातील केवळ १६ मैदानांचा खेळण्याकरिता उपयोग करण्यात येत आहे. ४ मैदाने गुंठेवारी कायद्यांतर्गत आली आहेत, तर गोसावी घाट, पीडब्ल्यूडी कार्यालय, झोपडपट्टी व खासगी लॉनने प्रत्येकी एकेक मैदान व्यापले असल्याची माहिती मनपाने दिली आहे.नासुप्रकडे ६१ मैदाने असून यापैकी २ मैदाने विकसित करण्यात आली आहेत.(प्रतिनिधी)