शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अजिंठा घाटात चार वाहनांचा विचित्र अपघात, 5 गंभीर, 2 म्हशी ठार

By admin | Updated: September 8, 2016 20:09 IST

घाटात भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसने समोरून येणा-या लोडींग रिक्षा व मोटार सायकल स्वारास जोराची धडक दिली.

ऑनलाइन लोकमत

अजिंठा, दि. 8 - घाटात भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटीबसने समोरून येणा-या लोडींग रिक्षा व मोटार सायकल स्वारास जोराची धडक दिली. तर बसच्या पाठीमागून येणारी व्हीस्टा कार बसला पाठीमागून धडकली. अशा चार वाहनांच्या िवचित्र अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले. तर दोन म्हशी जागीच ठार झाल्या. हा अपघात गुरूवारी दुपारी 2 .30 वाजता अजिंठा घाटात झाला.या अपघातात शिवाजी आत्मारा मुके, तात्याराव लक्ष्मण पाचिंगे, मानसा माणिकराव पाचिंगे, रा. अनाड ता. सिल्लोड, मोतीराम नामदेव ढाकरे रा. अजिंठा, निलाबाई निवडे रा. वसई हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. तर व्हीस्टा कार व एसटी मधील काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. ते उपचारा साठी आपापल्या गावी निघून गेले. त्यांची नावे मिळू शकली नाही. यावेळी अपघातग्रस्त एसटीत ५३ प्रवाशी होते.गुरूवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास वैजापूर सिल्लोड बस क्र.एम.एच.२० बीएल २३९२ ही भरधाव वेगाने अजिंठा घाट उतरत असताना चालकाचा बस वरील नियंत्रण सुटले. समोरून येणाऱ्या छोटा हत्ती लोडींग क्र. एम.एच.२० सीटी १९९३ ला धडक दिली. त्या मागे येत असलेली होंडा मोटारसायकल क्र. एम.एच.२० सीएन ३०७७ बसच्या चाकाखाली चिरडली गेली. यात छोटा हत्ती पलटी झाला. यातील दोन म्हेशी जागेवरच दबून ठार झाल्या. या चौरगी अपघातात शिवाजी मुके, तात्याराव पाचिंगे, मानसा पाचिंगे, मोतीलाल ढाकरे हे चार जण गंभीर रित्या जखमी झाले. तसेच मोटारसायकवरिल पांडुरंग निवडे यांनी चालत्या मोटारसायकलवर उडी मारल्याने तो बचावला. तर त्यांची आईनिलाबाई निवडे यांचा एक पाय तुटला त्या गंभीर जखमी झाल्या आहे. अपघातानंतर एसटी बस चालकांनी धूम ठोकली. ग्रामीण रूग्णालयात जखमीवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद घाटीकडे पाठविण्यात आले.याप्रकरणी अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदण्याची प्रक्रीया उशीरा पर्यंत सुरू होती.