शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापिकेसह चार लाचखोरांना अटक

By admin | Updated: July 18, 2014 00:57 IST

गडचिरोली तालुक्यातील नवेगाव मुरखळा येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेला, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात टेंभा येथील पाणीपुरवठा व स्वच्छता समिती

गडचिरोली, वर्धा, भंडाऱ्यातील घटना : शिक्षण संस्था महिला सचिवाला न्यायालयात अटक
गडचिरोली/वर्धा/भंडारा : गडचिरोली तालुक्यातील नवेगाव मुरखळा येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेला, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात टेंभा येथील पाणीपुरवठा व स्वच्छता समिती अध्यक्षासह ग्रामसेविका आणि भंडारा येथे न्यायालय परिसरातच शिक्षण संस्थेच्या महिला सचिवाला गुरूवारी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. चारही आरोपींविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गडचिरोली तालुक्यात नवेगाव येथील महात्मा गांधी विद्यालयात शाळा सोडल्याचा दाखला मिळविण्यासाठी मिथून रणजित मुजूमदार रा. नवेगाव मुरखळा यांनी अर्ज केला होता. त्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका कविता सदाशिव दोनाडकर (५७) यांनी ५०० रूपयाची लाच मागितली.
या संदर्भात मुजूमदार यांनी गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर आज दुपारी सापळा रचून मुख्याध्यापिका कविता दोनाडकर यांना महात्मा गांधी विद्यालयाच्या कार्यालयात सायंकाळी ४.२० वाजता ५०० रूपयाची लाच घेताना अटक करण्यात आली. त्यांच्याविरूध्द गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्धा जिल्ह्यात टेंभा येथे राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत नळ योजनेच्या टाकीच्या बांधकामाचे ३६ लाखांचे कंत्राट नागपूर येथील अरविंद चेंदनखेडे यांना मिळाले. त्यांनी हे काम नत्थूजी तेलरांधे रा. बेलतरोडी जि. नागपूर या कंत्राटदाराच्यामार्फत करुन घेतले. तेलरांधे यांनी १७ लाख ८२ हजार रुपयांचे बांधकाम पूर्ण झाले. मोबदल्यात तेलरांधे या कंत्राटदाराला १४ लाख ४० हजार रुपयांचे देयक देण्यात आले.
उर्वरित देयके काढून देण्यासाठी ग्रामसेविका वनीता राठोड आणि पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष धनराज घराडे यांनी एकूण बांधकाम किमतीच्या तीन टक्के म्हणजेच ३१ हजार रुपये लाचेच्या स्वरुपात मागितले. तेलरांधे यांनी ३० हजार देण्याचे मान्य केले. मात्र लाच द्यायची नसल्याने तेलरांधे यांनी वर्धा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदविली. त्यानुसार, गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ग्रामसेविकेच्या हिंगणघाट येथील निवासस्थानी वर्धा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने करण्यात आली यात पोलीस उपअधीक्षक अनिल लोखंडे, पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर, प्रदीप देशमुख, गिरीष कोरडे, प्रदीप कदम, माणिक गोडे, रागिणी हिवाळे, सागर सांगोडे, राजेंद्र बुरबुरे, संजय डगवार यांनी सापळा रचून ही कारवाई यशस्वी केली.
खमारी बुटी येथील राजू फत्तू बोरकर यांचा मुलगा विजय हा कस्तुरबा गांधी विद्यालय बेलगाव येथील बारावी वाणिज्य शाखेचा विद्यार्थी होता. सन २०१२-१३ मध्ये तो दोनवेळा अनुत्तीर्ण झाला. त्यामुळे त्याला बारावीत पुन:प्रवेश मिळावा, याकरिता राजू बोरकर यांनी शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय कारधा येथे प्रयत्न केला. मात्र प्राचार्य हलमारे यांनी प्रवेश प्रक्रिया बंद झाली असून अ‍ॅडमिशन होणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर सदर महाविद्यालयाच्या संस्थेचे सचिव नलिनी विष्णू काळे यांनी मुलाची अ‍ॅडमिशन करून देण्याचे अभिवचन दिले.
बोरकर यांच्याकडून विद्यार्थ्याचे कागदपत्रे घेतली व यानंतर त्यांना पाच हजार रुपयाची मागणी केली. हलाखीची परिस्थिती असल्याने बोरकर यांनी पाच हजार रुपये देण्याऐवजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे काळे यांची तक्रार केली. पाच हजारांऐवजी चार हजार रुपये देण्यावर तडजोड करण्यात आली. दरम्यान भंडारा न्यायालय परिसरात लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काळे यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस उपायुक्त वसंत शिरभाते, पोलीस अधीक्षक मानकर, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक प्रशांत कोलवाडकर, पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, सहाय्यक फौजदार हेमंत उपाध्ये, पोलीस हवालदार उके, नापोका अशोक लुलेकर, भाऊराव वाडीभस्मे, गौतम राऊत, सचिन हलमारे, मनोज पंचबुद्धे, लोकेश वासनिक, रसिका कंगाले, मनोज चव्हाण आदींनी केली.(लोकमत न्यूज नेटवर्क)