आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 10:18 IST2026-04-20T10:17:36+5:302026-04-20T10:18:07+5:30

अल्पवयीन मुलाला मुलींचे कपडे घालून बळजबरीने वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या तृतीयपंथीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

First kidnapping, then forced prostitution by dressing up in girls' clothes, shocking incident in Mumbai | आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं

आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई:अल्पवयीन मुलाला मुलींचे कपडे घालून बळजबरीने वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या तृतीयपंथीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. बाबू आयनल खान ऊर्फ बाबू गुरू ऊर्फ बाबू (३०) असे आरोपीचे नाव असून, त्याच्यावर यापूर्वी गुन्हे नोंद आहेत. 

तक्रारदाराच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याला जबरदस्तीने तृतीयपंथी बनविण्यात आले होते. सुरुवातीला लोकलमध्ये भीक मागण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायासाठी पाठविले जात होते. मुलाच्या अपहरणाच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या कक्ष ६ चे पथकही करू लागले. तपासादरम्यान प्रभारी निरीक्षक भरत घोणे यांना खबऱ्याने आरोपीची माहिती दिली. वाशीच्या कोपरी गावात  अस्तित्व लपवून राहत होता. त्यानुसार पोलिसांनी कारवाईसाठी सापळा लावला. मात्र, पोलिस आल्याची कुणकुण लागताच आरोपी साथीदारांसह कारने पळाला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पांजरपोळ जंक्शन येथे ताब्यात घेतले.

आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार

बाबू विरुद्ध शिवाजीनगरमध्ये २ आणि कुर्ला, नारपोली, देवनार पोलिस ठाण्यात प्रत्येकी एका गुन्ह्याचा समावेश आहे. त्याने अशा प्रकारे अन्य कुठल्या मुलांवर अत्याचार केलेत का? याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title : मुंबई: नाबालिग का अपहरण, लड़की बनकर वेश्यावृत्ति; गिरफ़्तारी

Web Summary : मुंबई पुलिस ने एक नाबालिग का अपहरण कर उसे लड़की के रूप में वेश्यावृत्ति के लिए मजबूर करने के आरोप में एक ट्रांसजेंडर व्यक्ति को गिरफ्तार किया। आरोपी, बाबू आयनल खान, का आपराधिक रिकॉर्ड है। उसने पहले बच्चे को भीख मांगने के लिए मजबूर किया, फिर देह व्यापार में धकेल दिया। पुलिस आगे की जांच कर रही है।

Web Title : Mumbai: Minor Kidnapped, Forced into Prostitution Dressed as Girl; Arrest Made

Web Summary : Mumbai police arrested a transgender person for kidnapping a minor, forcing them into prostitution dressed as a girl. The accused, Babu Ainal Khan, has prior criminal records. He initially forced the child to beg, then into sex work. Police are investigating further potential victims.