शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

अखेर दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा होणार; नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये परीक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 8:17 PM

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना उद्या(दि. १९)पासून ऑनलाईन अर्ज भरता येणार

ठळक मुद्देशुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या विभागीय मंडळाकडे जमा कराव्या लागणार

पुणे : कोरोनामुळे लांबणीवर पडलेली इयत्ता दहावी व बारावीची पुरवणी परीक्षा अखेर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. तसेच या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आज (दि. १९)पासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.मार्च महिन्यातील परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर जुलै-ऑगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षा घेतली जाते. मात्र यावर्षी कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. परिणामी मार्चमधील परीक्षांचा निकालही लांबणीवर पडला. जुलै महिन्यात निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षांचे वेध लागले होते. पण कोरोनाचे संकट कायम असल्याने या परीक्षांबाबतही अनिश्चितता होती. परीक्षा न झाल्यास अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती होती. पण अखेर राज्य मंडळाने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये परीक्षा घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. यामध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत.इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच क्षेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरून आज पासून विद्यार्थ्यांना अर्ज भरता येतील. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत दि. २९ ऑक्टोबरपर्यंत आहे. तर दि. ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत. ही प्रक्रिया ऑनलाईन असल्याने विद्यार्थ्यांना शाळा किंवा महाविद्यालयामार्फत अर्ज भरावे लागतील. उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना दि. ३ व ४ नोव्हेंबरला बँकेत शुल्क भरावे लागेल. तर दि. ५ नोव्हेंबर रोजी शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या विभागीय मंडळाकडे जमा कराव्या लागणार आहेत.------------ऑनलाईन अर्जासाठी संकेतस्थळ :-------------ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखा :नियमित शुल्कासह : दि. २० ते २९ ऑक्टोबरविलंब शुल्कासह : दि. ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर 

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाStudentविद्यार्थीEducationशिक्षण