शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

डोळे भरून ‘त्या’ तान्हुल्याकडे पाहत होत्या

By admin | Updated: August 1, 2014 04:00 IST

निसर्गाच्या प्रकोपातही माळीण गावातील एक महिला व तिचे तीन महिन्यांचे बालक चमत्कारीकरीत्या बचावले असून त्यांच्यासह ५ जणांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़

मंचर (जि. पुणे) : निसर्गाच्या प्रकोपातही माळीण गावातील एक महिला व तिचे तीन महिन्यांचे बालक चमत्कारीकरीत्या बचावले असून त्यांच्यासह ५ जणांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़रुद्र असे या बालकाचे नाव असून त्याच्या पायाला खरचटले आहे. त्याची आई प्रमिला मच्छिंद्र लेंभे हिची पाठ आणि खांदा दुखावला आहे़ डोळे भरून ती आपल्या तान्हुल्याकडे पाहत होत्या़या दुर्घटनेबद्दल प्रमिला म्हणाली, अचानक वीज कडाडल्यासारखा आवाज होऊन कौले पडली़ बाळाला डाव्या बाजूला घेऊन मी पळत घराबाहेर चालले होते, तोच माझ्या उजव्या बाजूची भिंत अंगावर पडली. मी बाळासकट खाली पडले़ माझ्या पाठीवर जड लाकडांचा भार होता. पाय ढिगाऱ्याखाली होते, एक हात मोकळा होता़ मी हळूहळू दोन्ही पाय सोडवून घेतले. बाळाला पायांवर ठेवले. मी खाली पडल्यापासून आरडाओरडा करत होते; पण तो कोणालाही ऐकू जात नव्हता़ पत्रा समोर आडवा होता, मी बसून राहिले असताना बाहेर आवाज ऐकू आला, त्या वेळी बाळाने रडणे सुरू केले. ते ऐकून काही तरुण आत आले. त्यांनी माझी अन् बाळाची सुटका केली. सकाळी ८ पासून दुपारी साडेचारपर्यंत आपण असहाय अवस्थेत अडकून पडलो होतो, असे सांगून प्रमिलाने सांगितले़