शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेगावचा संपूर्ण विकास जून-२०१६ पर्यंत

By admin | Updated: July 17, 2014 01:00 IST

संत गजानन महाराज यांच्या शेगावचा जून-२०१६ पर्यंत संपूर्ण विकास करण्यात येईल, अशी ग्वाही अमरावती विभागीय आयुक्त डी.आर. बनसोड यांनी शासनाच्या वतीने दिली आहे. यासंदर्भात त्यांनी आज,

हायकोर्टात प्रतिज्ञापत्र : आराखड्यातील केवळ ४० टक्के काम पूर्ण
नागपूर : संत गजानन महाराज यांच्या शेगावचा जून-२०१६ पर्यंत संपूर्ण विकास करण्यात येईल, अशी ग्वाही अमरावती विभागीय आयुक्त डी.आर. बनसोड यांनी शासनाच्या वतीने दिली आहे. यासंदर्भात त्यांनी आज, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर केले.
न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांच्यासमक्ष प्रकरणावर सुनावणी झाली. दरम्यान, सरकारी वकील भारती डांगरे यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानंतर न्यायालयाने अन्य बाबी विचारात घेण्यासाठी २३ जुलै रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. शेगाव विकास आराखड्यातील आतापर्यंत केवळ ४० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. स्थानिक नागरिकांचे सहकार्य मिळत नसल्यामुळे निर्धारित वेळेत कामे पूर्ण करता आली नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यापूर्वीच्या प्रतिज्ञापत्रात शासनाने मे-२०१४ पर्यंत विकास कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.
शासनाच्या माहितीनुसार, खामगाव-शेगाव-आकोट व शेगाव-बाळापूर राज्य महामार्गाचे चौपदरीकरण, झाडेगाव फाटा ते चामोर्शी रोड, पुनर्वसनासाठी जमीन खरेदी, पाणीपुरवठा योजना, पोलीस ठाण्याची इमारत, पोलिसांचे वसतिगृह, कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी, साईबाळ मते रुग्णालय येथे धर्मशाळेची इमारत, ४८ खाटा क्षमतेच्या दोन इमारती, सुलभ शौचालयाची इमारत, विश्रामगृहाची इमारत, बसस्थानकाचा विकास इत्यादी कामे जवळपास पूर्ण झाली आहेत.
अनेक ठिकाणी रहिवासी अतिक्रमण आहे. यामुळे रस्ते रुंद करणे कठीण जात आहे. विविध प्रकल्पांसाठी जागेची गरज असून खासगी जागा मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ३६९ प्रकरणात अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. मातंग वस्तीच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जात आहेत. १७७ पैकी ११९ कुटुंबीयांनी पुनर्वसनासाठी परवानगी दिली आहे. यासाठी जमीन खरेदी करण्यात आली आहे. घरांचे बांधकाम दोन वर्षांत पूर्ण करून वस्ती हलविण्यात येईल. स्काय वॉकचा आराखडा मंजूर झाला असून त्याला प्रशासकीय मान्यताही देण्यात आली असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा व अ‍ॅड. अनिल किलोर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)
३६०.४० कोटींचा आराखडा मंजूर
राज्य शासनाने शेगाव शहराच्या विकासाकरिता ३६०.४० कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे. यापैकी २५० कोटी राज्य शासन, ३१ कोटी केंद्र शासन, १३.९० कोटी शेगाव नगर परिषद, तर ६५.५० कोटी रुपये गजानन महाराज संस्थान देणार आहे. राज्य शासनाने २४६.२८ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. ६१.०३ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली असून १२०.४० कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. विकासकामांसंदर्भात २६ आॅक्टोबर २००९, २२ फेब्रुवारी २०१० व ८ मार्च २०१० रोजी अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत.