शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
5
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
6
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
7
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
8
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
9
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
10
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
11
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
12
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
13
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
14
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
15
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
16
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
17
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
18
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
19
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
20
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
Daily Top 2Weekly Top 5

पर्यायी मार्गांमुळे एसटी ‘खड्ड्या’त

By admin | Updated: August 22, 2016 05:38 IST

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या ग्रुप बुकिंग योजनेला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे

सुशांत मोरे,

मुंबई- गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या ग्रुप बुकिंग योजनेला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, मार्ग क्रमांक ६६ ची झालेली दुरवस्था पाहता आणि वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने प्रवाशांना पर्यायी मार्ग सुचविले आहेत. या मार्गांमुळे एसटी प्रवाशांच्या खिशाला जरी कात्री लागणार असली, तरी महामंडळालाही या मार्गावरून जाताना मोठा टोल भरावा लागणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्याच पाच दिवसांतच तब्बल २१ लाख रुपये टोल भरावा लागेल, अशी माहिती समोर आली आहे. महामार्ग क्रमांक ६६ हा जुना एनएच-१७ म्हणून ओळखला जातो. हा मार्ग मुंबई-पनवेल-पेण-माणगाव-महाड आणि पुढे जातो. या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे परिवहन विभागाने मुंबई ते चिपळूणपर्यंत जाणाऱ्या बसेस खोपोली, पालीमार्गे माणगाव, महाड, चिपळूणपर्यंत, तर चिपळूणच्या पुढे रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये जाणाऱ्या एसटी बसेसना पुणे, सातारा, उंब्रज (कुभांर्ली घाट) मार्गे जाण्याचा पर्याय दिला आहे. हा पर्याय फक्त ग्रुप बुकिंग केलेल्या एसटी बसेसना लागू आहे. एसटी महामंडळाच्या जवळपास २००० फेऱ्यांचे ग्रुप बुकिंग झाले असून, त्यांनी जुन्या अथवा पर्यायी मार्गांपैकी एक मार्ग निवडायचा आहे. पर्यायी मार्ग निवडल्यास प्रवाशांच्या खिशाला कात्री लागतानाच महामंडळालाही टोलचा भुर्दंड पडणार आहे. जुन्या मार्गे एसटीच्या ग्रुप बुकिंग बसेस गेल्यास त्यांना वाशी जवळचा एकच टोल लागेल, तर पर्यायी मार्गावरून गेल्यास वाशी, मेगा हायवे, खेड-शिवापूर, आनेवाडी आणि उंबरज व वठार असे टोल लागतील. पर्यायी मार्गावरून गेल्यास महामंडळाला १ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर या काळात टोल भरण्यासाठी एकूण २१ लाख रुपये मोजावे लागतील. वाहतूककोंडी होऊ नये आणि गणेशोत्सवात महामार्गावरील प्रवास सुकर व्हावा, यासाठी पर्यायी मार्ग स्वीकारताना महामंडळाला मोठा भुर्दंड पडत असल्याने शासनाने टोलमाफी द्यावी, यासाठी एसटीची धडपड सुरू आहे. ‘आॅन द स्पॉट’ जादा भाडे घेणारमोठ्या प्रमाणात एसटीचे ग्रुप बुकिंग झाले आहे. ग्रुप बुकिंग प्रवाशांनी पर्यायी मार्गाने जाण्याचा निर्णय घेतल्यास, त्यांना जादा भाड्याची कल्पना देण्यात येईल आणि त्याच वेळी बसमध्ये प्रवाशांकडून जादा भाडे घेण्यात येईल, असा निर्णय दोन दिवसांपूर्वीच एसटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कणकवलीला जाईपर्यंत प्रत्येकी १00 रुपयांपेक्षा जास्त जादा रुपये मोजावे लागतील. >गणेशोत्सवानिमित्त पर्यायी मार्गावरून जाणाऱ्या बसेसना टोलमाफी मिळालेली नाही. किती ग्रुप बुकिंग बसेस पर्यायी मार्गावरून जाणार आहेत, त्याचा आढावा घेत आहोत आणि त्यानुसार, शासनाकडे आम्ही टोल माफी मागू. - रणजित सिंह देओल (एसटी महामंडळ-व्यवस्थापकीय संचालक)पर्यायी मार्गामुळे एसटी महामंडळाला टोल भरावा लागतानाच इंधनाचा खर्चही येणार आहे. त्यामुळे महामंडळाच्या तिजोरीवरही भार पडेल, असे सांगितले जाते.