शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

Nala Sopara: नालासोपाऱ्यात अडीच कोटींचे अंमली पदार्थ जप्त, नायजेरियन आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 16:40 IST

Nala Sopara Drugs News: शहरात एकापाठोपाठ एक अंमली पदार्थाच्या तस्करी होण्याच्या घटना समोर आल्या

मंगेश कराळे, नालासोपारा: शहरात एकापाठोपाठ एक अंमली पदार्थाच्या तस्करी होण्याच्या घटना समोर आल्या. बुधवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास पूर्वेकडील मोरेंगाव तलाव येथील एका इमारतीच्या खाली अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या नायजेरियन आरोपीला अटक केली. अंथोनी ओडिना (वय, ४३) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून २ कोटी ५० लाखांचा १ किलो १२५ ग्रॅम एम डी नावाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.

वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागात छुप्या मार्गाने अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. बुधवारी सकाळी मोरेंगाव तलाव परिसरातील प्रियंका बिल्डिंगच्या खाली एक आरोपी अंमली पदार्थ तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती तुळींज पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तुळींज पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथक व एटीसी पथकाने सापळा रचून संशयित नायजेरियन आरोपीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता १ किलो १२५ ग्रॅम वजन असलेला २ कोटी ५० लाख रुपये किंमतीचा एम डी नावाचा अंमली पदार्थ आढळून आला आहे.

याप्रकरणी अंथोनी ओडिना या आरोपीला अटक करून त्याच्या विरुद्ध तुळींज पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोवैद्यानिक परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (एनडीपीएस ऍक्ट ) कलम ८ (क), २१ (क), २२,२९ सह विदेशी नागरिक कायदा १९४६ चे कलम १४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील सात दिवसांत तुळींज पोलिसांनी प्रगतीनगर, सेंट्रल पार्क आणि बुधवारी मोरेंगाव या तीन ठिकाणी तीन कारवाई करून ९ कोटी ७० लाख रुपयांच्या मुद्देमालासह तीन नायजेरियन आरोपींना अटक केली.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnalasopara-acनालासोपारा