शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गेल्यावेळी जिंकलेल्या एकही जागा सोडणार नाही; दानवेंचा आक्रमक पवित्रा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 09:32 IST

शिवसेना-भाजपा मित्रपक्ष असले तरी गेल्या निवडणुकीत भाजपाने 123 जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेने 63 जागा जिंकल्या होत्या.

मुंबई - लोकसभा निवडणुकीआधी शिवसेना-भाजपाने युती केली असली तरी विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्रिपदावरुन दोघांमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री आमचाच अशा दोन्ही पक्षाच्या भूमिकेवरुन नेते एकमेकांविरोधी भूमिका घेत असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी आमचं ठरलंय ही सावध भूमिका मांडली आहे. 

विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांच्यात 50-50 फॉर्म्युला ठरलेला आहे. मात्र गेल्यावेळी भाजपाने जिंकलेल्या 123 जागांपैकी एकही जागा भाजपा सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी घेतला आहे. शिवसेना-भाजपा मित्रपक्ष असले तरी गेल्या निवडणुकीत भाजपाने 123 जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेने 63 जागा जिंकल्या होत्या. ज्या जिंकलेल्या जागा आहेत त्या सोडल्या जाणार नाहीत. ज्या जागांवर पराभव झाला त्याठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या नंबरवर कोणता पक्ष असेल त्या जागा समन्वयाने एकमेकांना सोडणार आहे असं दानवेंनी सांगितले. 

तसेच मुख्यमंत्रिपदावरून थेट भाष्य न करता मुख्यमंत्री कोण होणार याची चिंता तुम्ही करु नका. शिवसेना-भाजपात मुख्यमंत्री कोण होणार हे ठरलेलं आहे. ते आम्ही ते तुम्हाला सांगणार नाही असं रावसाहेब दानवेंनी स्पष्ट केलं. दरम्यान विधानसभा निवडणुकीत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याबाबत आमच्या पक्षाची तयारी आहे. अटलबिहारी वाजपेयींपासून ते  नरेंद्र मोदींपर्यंत हीच भूमिका आहे. महिलांना सक्रीय राजकारणात आणण्यासाठी त्यांना 33 टक्के आरक्षण द्यावं अशीच भाजपाची भूमिका असल्याचं दानवेंनी सांगितले. 


मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपात कुरघोडीचं राजकारण असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना-मेळाव्यात वाघ आणि सिंह एकत्र आल्याने सत्ता कोणाची येणार हे सांगण्याची गरज नाही असं वक्तव्य केलं. मात्र विधानामधील वाघ शिवसेना तर सिंह भाजपा असल्याचं मुख्यमंत्र्यांचे म्हणणं असेल तर सिंह जंगलाचा राजा असतो त्यामुळे मुख्यमंत्री भाजपाचा असेल असं मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरुन स्पष्ट होतं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर नेमकं काय घडतं मुख्यमंत्री कोण होतं हे काही महिन्यांमध्ये स्पष्ट होणार आहे. 

सर्व २८८ जागांची तयारी ठेवा; भाजपचा आदेश

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाRaosaheb Danweरावसाहेब दानवे