विलीनीकरणावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत चर्चा; या आठवड्यात बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी घडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 07:18 IST2026-02-09T07:16:28+5:302026-02-09T07:18:02+5:30

सुनेत्रा पवार मुंबईत आल्यानंतर अजित पवार गट विलीनीकरणाबाबत त्यांच्याशी चर्चा करणार आहे. या चर्चेपूर्वी पक्षातील आमदार आणि मंत्र्यांची मते जाणून घेतली जातील, अशीही शक्यता आहे.

Discussions within Ajit Pawar NCP on merger; Many important developments will happen this week | विलीनीकरणावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत चर्चा; या आठवड्यात बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी घडणार

विलीनीकरणावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत चर्चा; या आठवड्यात बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी घडणार

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा आठवडा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. या आठवड्यात अजित पवार गटातर्फे विलीनीकरणाबाबत पक्षांतर्गत चर्चा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सुनेत्रा पवार या मंगळवारी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारतील. शपथविधी झाल्यानंतर त्या मंत्रालयात आलेल्या नाहीत. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठक असल्याने त्या बैठकीला हजर राहण्यासाठी मंत्रालयात येतील. तत्पूर्वी त्या सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्री दालनात जाऊन आपल्या पदाची सूत्रे घेतील.

सुनेत्रा पवार मुंबईत आल्यानंतर अजित पवार गट विलीनीकरणाबाबत त्यांच्याशी चर्चा करणार आहे. या चर्चेपूर्वी पक्षातील आमदार आणि मंत्र्यांची मते जाणून घेतली जातील, अशीही शक्यता आहे. आमचा पक्ष हा अजित पवार यांचा राजकीय परिवार आहे. परिवारातील सर्व सदस्य विलीनीकरणाबाबत निर्णय घेतील, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नुकतेच स्पष्ट केले होते.

शरद पवार गटाच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष
दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवारही या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी समोर आणणार आहेत. प्रामुख्याने अजित पवार यांच्याबरोबर शरद पवार गटाच्या ज्या बैठका झाल्या होत्या, त्या बैठकांना रोहित पवारही उपस्थित होते. अजित पवार यांनी जवळच्या लोकांना आणि मला काही गोष्टी सांगितल्या होत्या, त्यावर मी बोलणार असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा आठवडा महत्त्वपूर्ण घडामोडींचा आहे.

Web Title : अजित पवार की राकांपा में विलय पर चर्चा; इस सप्ताह महत्वपूर्ण घटनाक्रम।

Web Summary : अजित पवार गुट इस सप्ताह विलय पर चर्चा करेगा। सुनेत्रा पवार पदभार ग्रहण करेंगी। रोहित पवार अजित पवार के साथ बैठकों के बारे में जानकारी देंगे। महत्वपूर्ण घटनाक्रम अपेक्षित।

Web Title : Merger discussions in Ajit Pawar's NCP; crucial developments this week.

Web Summary : Ajit Pawar's faction to discuss merger this week. Sunetra Pawar assumes office. Rohit Pawar to reveal details about meetings with Ajit Pawar. Key developments expected.