शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

डिंभे धरण उजव्या कालव्याला गळती

By admin | Updated: August 25, 2016 01:40 IST

पाणीबचतीचा संदेश देण्यासाठी जलसंपदा विभागाने उन्हाळ्यात जलजागृती सप्ताह आयोजित करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला

घोडेगाव : राज्यभर पाणीबचतीचा संदेश देण्यासाठी जलसंपदा विभागाने उन्हाळ्यात जलजागृती सप्ताह आयोजित करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. परंतु, आज जलसंपदा विभागाची धरणे भरल्यानंतर त्यांच्याच धरण व कालव्यांना असलेल्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. आंबेगाव तालुक्यात शिनोली गावाजवळ घोड नदीवरून गेलेल्या डिंभे धरण उजवा कालव्याला लागलेल्या गळतीमुळे आजही मोठ्या प्रमाणात पाणी गळून वाया जात आहे. सध्या धरण व कालव्यांना लागलेल्या पाणीगळतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक वर्षांपासून धरण व कालव्यांमधील गळती थांबविण्यासाठी निधी उपलब्ध झालेला नाही; त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू आहे. या गळतीमुळे धरणांना धोका निर्माण झाला आहे, तर कालवे फुटण्याची शक्यता कालव्यांजवळ राहणारे ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. ही गळती काढण्याचे काम तत्काळ केले गेले नाही, तर भविष्यात मोठा बिकट प्रसंग ओढवू शकतो. जलसंपदा विभागाने पाणीबचतीचा संदेश लोकांना देण्यापेक्षा स्वत: पाणीगळती थांबविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे व ही गळतीची कामे चांगली दर्जेदार केली पाहिजेत. पाणीगळती थांबली, तर पाणीटंचाईमध्ये या पाण्याचा मोठा उपयोग होऊ शकतो. (वार्ताहर)>कुकडी प्रकल्पातील डिंभे व माणिकडोह धरणांना मोठ्या प्रमाणात गळती आहे. या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाहून जाते. तसेच, सध्या आंबेगाव तालुक्यातून गेलेल्या डिंभे धरण उजवा कालव्याला मोठी गळती सुरू आहे. शिनोली गावाजवळ घोड नदीवरून गेलेल्या कालव्यातून सध्या धबधब्यासारखे पाणी पडत आहे. हे पाणी पडताना पाहून अनेकजण भीती व्यक्त करतात. सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेस आयचे तालुक्यातील नेते बी. बी. राक्षे यांनी ही गळती तत्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.