शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 09:17 IST

Laxman Hake : काल लातूरमध्ये ‘छावा’चे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे-पाटील यांना मारहाण झाल्याचे समोर आले. या प्रकरणाचे आता राज्यभरात प्रतिक्रिया उमटत आहेत.

Laxman Hake : लातूरमध्ये  ‘छावा’चे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे-पाटील यांना मारहाण झाल्याचे समोर आले. या प्रकरणानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांना निवेदन दिल्यानंतर राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण आणि कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे समोर आले. यावर आता ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली.  हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उमपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना आवर घालण्याची मागणी केली. 

Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी आता आम्ही खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल

"शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संविधानिक मार्गाने आंदोलन केलं. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडे आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याकडे उत्तर नव्हतं. मग त्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना उत्तर काय दिले तर मारहाण केली. या अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना आवरा नाहीतर तुमचे जहाड निश्चित समुद्राच्या तळाशी घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही',असंही लक्ष्मण हाके म्हणाले.

'सुरज चव्हाणांना अटक करा : अंजली दमानिया

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित सुरज चव्हाण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. "सुरज चव्हाणांना ताबडतोब अटक करा. ही गुंडगिरी आता आम्ही खपवून घेणार नाही. कृषी मंत्री अधिवेशनात ऑनलाइन पत्ते खेळतात आणि लोकांना राग येऊन त्यांनी निषेध व्यक्त केला तर त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत ही गुंड प्रवृत्तीची लोकं मारणार?, असा सवाल दमानिया यांनी केला. 

"सूरज चव्हाण ह्या माणसाची इतकी मजाल की, ह्या घटनेनंतर ते एका मराठी चॅनेलशी बोलताना म्हणतात की त्या लोकांनी ‘असंविधानिक’ भाषा वापरली? म्हणून तुम्ही मारहाण करणार? मग मारहाण करणे हे कृत्य संविधानिक आहे ?", असंही दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. 

"तुम्हाला संविधान या शब्दाचा अर्थ तरी कळतो का ? तातडीने त्या सूरज चव्हाणांची पदावरून हकालपट्टी करा", अशी मागणी दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहेत. तसेच "मुख्यमंत्री फडणवीस आता तरी थांबवा ही गुंडगिरी', असंही या पोस्टमध्ये दमानिया यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :laxman hakeलक्ष्मण हाकेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस