शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीचा 'पद्मश्री' डॉक्टर किडनी रॅकेटचा सूत्रधार; विधानसभेत धक्कादायक आरोप, शेतकरी किडनी विक्रीचे तीव्र पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 09:05 IST

नागभीड (जि. चंद्रपूर) तालुक्यातील मिथूर येथील शिवदास कुडे या शेतकऱ्याने खासगी कर्जफेडीसाठी किडनी विकल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद सभागृहात उमटले.

मुंबई : त्रिची (तामिळनाडू) येथील एक नामांकित हॉस्पिटल आणि देशभर किडनी प्रत्यारोपणाची शस्रक्रिया करणारे पद्मश्री विजेते दिल्लीतील एक डॉक्टर यांचा किडनी रॅकेट प्रकरणात सहभाग असल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी विधानसभेत केला. नागभीड (जि. चंद्रपूर) तालुक्यातील मिथूर येथील शिवदास कुडे या शेतकऱ्याने खासगी कर्जफेडीसाठी किडनी विकल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद सभागृहात उमटले.

वडेट्टीवार म्हणाले की, त्रिचीमधील त्या हॉस्पिटलवर कारवाई करण्यासाठी चंद्रपूरचे पोलिस गेले होते, पण त्यांना स्थानिक लोकांनी पिटाळून लावले. दिल्लीतील तो पद्मश्री डॉक्टर इतका प्रभावशाली आहे की, त्याला कोणीही हात लावू शकत नाही. शिवदास कुडे प्रकरणात आठ जणांना अटक करण्यात आली, पण ते सगळे जामिनावर सुटले, त्यांना मकोका लावण्याची मागणी दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी केली. तेव्हा, कायदेशीर बाबी तपासून मकोका लावला जाईल, असे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले.

आरोपींना मकोका लावण्याची मागणी

भाजपचे अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडताना आरोपींना मकोका लावण्याची आणि नागभीडचे प्रकरण विशेष न्यायालयात चालविण्याची मागणी केली.

नागभीडच्या शेतकऱ्याने १ लाख रुपयांचे कर्ज फेडता-फेडता ७४ लाख रुपये दिले, शेती विकली, ट्रॅक्टरही विकले. आज रस्त्यावर आलेल्या या कुटुंबाला किमान १० लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. काँग्रेसचे नितीन राऊत, शिंदेसेनेचे अर्जुन खोतकर, भाजपचे रणधीर सावरकर, राष्ट्रवादी (अजित पवार) चे प्रकाश साळुंके, योगेश सागर यांनी उपप्रश्न विचारत सरकारला घेरले.

सावकारी कायद्यातील नियम कठोर करणार

नागभीडच्या प्रकरणातील सहा आरोपी हे परवानाधारक सावकर नव्हते. मात्र, यानिमित्ताने परवानाधारक सावकारांसाठीचे सरकारचे नियम अधिक कडक केले जातील आणि परवाना नसलेल्या अवैध सावकारांना अटकाव करण्यासाठी कायदा अधिक कठोर केला जाईल, असे आश्वासन राज्यमंत्री भोयर यांनी दिले.

नागभीडच्या प्रकरणात सोलापुरातील एक सावकार आणि त्याच्या सहायकालाही अटक करण्यात आली होती. त्रिचीमधील ते हॉस्पिटल आणि दिल्लीतील डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी सरकार पाठपुरावा सुरूच ठेवेल, असे ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi's 'Padma Shri' doctor mastermind of kidney racket: Allegations in Assembly.

Web Summary : A 'Padma Shri' doctor from Delhi is accused of kidney racket involvement. A farmer's kidney sale sparked outrage in the Assembly, demanding strict action and financial aid for the victim's family. Government promises stricter laws against illegal moneylenders.
टॅग्स :vidhan sabhaविधानसभाMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीHuman Traffickingमानवी तस्करी