सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ बराच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील दातियाच्या बेरछा गावातला आहे. जिथं भागवत कथा कार्यक्रमात मंचावर जे काही घडले त्याने सगळेच हैराण झाले. व्यासपीठाच्या गादीवर बसलेले संत सीताराम बाबा यांचा आशीर्वाद घ्यायला पोहचलेले भाजपा आमदार प्रदीप अग्रवाल बाबांनी जोरदार ठोसे लगावले आणि आपल्यापासून लांब ढकलले.
विशेष म्हणजे सीताराम बाबांच्या या वर्तणुकीने आमदार प्रदीप अग्रवाल कुठलाही विरोध न करता गुडघ्यावर बसून बाबाचा आशीर्वाद घेत राहिले. त्यामुळे सीताराम बाबा कोण आहेत अशी चर्चा नेटिझन्समध्ये सुरू झाली आहे. संत सीताराम बाबा हे मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील निसरोल मंदिराचे महंत आहेत. ते या परिसरातील प्रसिद्ध संत आणि कुशल कथावाचक मानले जातात. सीताराम बाबा हे त्यांचे गुरू मस्तराम बाबा यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालतात. भिंडच्या रसनौल येथील मस्तराम बाबाचे स्थान आस्थेचे केंद्र आहे. सीताराम बाबा हीच परंपरा पुढे घेऊन जात आहेत. त्यांच्याकडे केवळ सामान्य भाविक येत नाही तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील मोठमोठे दिग्गज नेते, उद्योगपती दर्शन घ्यायला येतात.
सीताराम बाबा त्यांच्या अनोख्या शैलीसाठी ओळखले जातात. ते कायम मंचावर तिखट शब्दांचा मारा करतात. कधी कधी भक्तांना धक्का देतात, फुलांची माळा फेकून मारतात. बाबाचे भक्त आणि शिष्य त्यांच्या या वागणुकीने नाराज होत नाहीत तर त्यांचा आशीर्वाद मानतात. बाबा ज्याला स्वत:चे समजतात, त्यांच्यावर अशाप्रकारे हक्क दाखवतात असं समर्थक सांगतात. वादांच्या उलट त्यांना जवळून ओळखणारे लोक त्याचे वर्णन त्यांच्या गुरूंप्रमाणेच एक साधा आणि शांत स्वभावाचा माणूस म्हणून करतात, जे दिखाऊपणापासून खूप दूर राहतात.
व्हायरल व्हिडिओत काय आहे?
सोशल मीडियात व्हायरल होणारी घटना बेरछा गावातील भागवत कथा कार्यक्रमातील आहे. ३६ सेकंदाच्या व्हिडिओत स्पष्टपणे दिसते की, आमदार प्रदीप अग्रवाल पूर्ण श्रद्धा भावनेने बाबांना फुलांची माळ घालण्यासाठी पोहचतात. जसे ते खाली वाकतात तेव्हा बाबांचा पारा चढतो. गादीवरूनच बाबा जोरजोरात ओरडत आमदाराला खडे बोल सुनावतात. त्यातच बाबा आमदाराला जोरात ठोसे मारतात आणि त्यांना मागे ढकलतात. आमदाराने घातलेली फुलांची माळही ते त्यांच्याच चेहऱ्यावर फेकून मारतात. यावेळी आमदार अग्रवाल एका शिष्याप्रमाणे क्षमा याचना मागत त्यांच्यासमोर बसलेले दिसतात. ही घटना ४-५ दिवसांपूर्वीची आहे जे इंटरनेटवर सध्या व्हायरल होत आहे.
Web Summary : Viral video shows Sitaram Baba hitting a BJP MLA during a religious event in Madhya Pradesh. The incident sparked curiosity about Baba's identity. He is known for his unique style and commands respect from devotees and politicians alike.
Web Summary : वायरल वीडियो में सीताराम बाबा मध्य प्रदेश में एक धार्मिक कार्यक्रम के दौरान भाजपा विधायक को मार रहे हैं। इस घटना ने बाबा की पहचान के बारे में जिज्ञासा पैदा कर दी। वह अपनी अनूठी शैली के लिए जाने जाते हैं और भक्तों और राजनेताओं से समान रूप से सम्मान पाते हैं।