शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मला हटवा !

By admin | Updated: March 21, 2015 00:43 IST

७२ नगरसेवक एकवटले : महापौरांचे स्वत:विरोधात मतदान

कोल्हापूर : काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ‘लाचखोर महापौरांनी राजीनामा द्यावा’, अशी जोरदार मागणी करत निषेधाचे फलक गळ्यात अडकवूनच सर्वसाधारण सभेत प्रवेश केला. मतदानासाठी बजावलेल्या पक्षादेशामुळे (व्हीप) संभावित कारवाईच्या भीतीने सभागृहात उपस्थित सर्वच ७२ नगरसेवकांसह महापौर माळवी यांनीही नगरसेवकपद रद्द करण्याच्या ठरावाच्या बाजूने मतदान करत ठरावास संमती दिली. तृप्ती माळवी यांनी महापौरपदाचा आधार घेत लाच स्वीकारल्यामुळे महापौरपदाचे नैतिक अध:पतन झाले आहे. पदाचा गैरवापर केल्याच्या कारणास्तव त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची शिफारस प्रशासनाने राज्य शासनाकडे करावी, असे दोन ठराव शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत झाले होते. त्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १३ (१) (अ) व (ब) तसेच कलम १० (१-१अ) मधील तरतुदींचा आधार घेण्यात आला होता. दरम्यान, न्यायालयाने असा ठराव सभागृहात करण्यास काहीच हरकत नाही, असा निर्वाळा दिल्याची माहिती महापालिकेच्या विधितज्ज्ञांनी दिली. ‘न्याय देवतेचा विजय असो’ अशा जोरदार घोषणा देत, याचे सत्ताधारी नगरसेवकांनी बाके वाजवून स्वागत केले.त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी, गटनते शारंगधर देशमुख व राजेश लाटकर यांनी महापौरविरोधातील ठरावाच्या विरोधी भूमिका किंवा मतदान करणाऱ्यांना पक्षविरोधी कारवाईनुसार नगरसेवकपद सोडावे लागेल, अशी माहिती दिली. त्यानंतर शिवसेना-भाजप आघाडीचे प्रमुख संभाजी जाधव व ‘जनसुराज्य’चे विरोधी पक्षनेता मुरलीधर जाधव यांनी आघाडीच्या सदस्यांना पक्षादेशानुसार ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले. मनपा कायद्यानुसार अशा ठरावावेळी संबंधिताला म्हणणे मांडण्याची संधी आहे, ती संधी महापौरांना द्यावी, याचा सभावृत्तांत समावेश करावा, अशी सूचना राजेश लाटकर यांनी मांडली. मात्र, महापौरांनी म्हणणे न मांडताच मतदान घेण्यास अनुमती दिली. त्यानंतर मुख्य लेखाधिकारी संजय सरनाईक व परिवहन व्यवस्थापक संजय भोसले यांच्या नियंत्रणाखाली मतदान प्रक्रिया पार पडली. सभागृहात एकूण ८२ सदस्यांपैकी ७७ सदस्य उपस्थित होते. पाच स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार नाही. त्यामुळे महापौरांसह सर्व उपस्थित ७२ नगरसेवकांनी हात वर करून ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यानंतर सत्ताधारी नगरसेवकांनी जोरदार बाके वाजवून आनंद व्यक्त केला. ‘लाचखोर प्रवृत्ती हद्दपार करा’, ‘कोल्हापूरची मान शरमेने खाली घालायला लावणाऱ्या प्रवृत्तीचा धिक्कार असो’ अशा जोरदार घोषणा दिल्या. हा ठराव विनाविलंब शासनाकडे पाठविण्याची मागणी केली. मतदानानंतर झालेल्या भाषणात नगरसेवकांनी पक्षीय राजकारणाचे उट्टे काढल्याने एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडत तणावाच्या वातावरणातच सभेचे कामकाज पूर्ण झाले.(प्रतिनिधी)महापौरांची हतबलतापक्षाने मतदानासाठी लेखी किंवा सभागृहात गटनेत्यांनी आदेश (व्हीप) बजावल्यानंतर तो संबंधित पक्ष किंवा आघाडीच्या सदस्यांनी पाळणे बंधनकारक असते. पक्षाने आणलेल्या ठरावाविरोधात इच्छा असूनही सदस्यांना बोलता किंवा मतदान करण्याचा अधिकार राहत नाही. पक्षादेश झुगारून मतदान केल्यास संबंधित सदस्याचे पद रद्द करण्याबाबत कारवाई करण्याचा अधिकार पक्षास आहे. असा पक्षादेश डावलल्याने अनेकजणांना नगरसेवक पदावर पाणी सोडावे लागले आहे.महापौैर माळवी यांच्यावर राष्ट्रवादी पक्षाने अजूनही निलंबनाची कारवाई केलेली नाही. त्यामुळे त्या पक्षाच्या सदस्य नगरसेविका आहेत. त्यांनाही पक्षाने व्हीप बजावला होता. त्यामुळे नाईलाजाने महापौरांना आपल्याच विरोधातील ठरावास हात वर करून संमती देण्याची हतबलता सहन करावी लागली.हे नगरसेवक अनुपस्थितमहापौर विरोधातील ठरावावेळी सभागृहात सर्जेराव पाटील, निशिकांत मेथे, मृदुला पुरेकर, दिगंबर फराकटे, पल्लवी देसाई हे पाच नगरसेवक अनुपस्थित राहिले. त्यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार, याबाबत उत्सुकता आहे.लाचखोर प्रकरणात कोणत्याही न्यायालयाने दोषी ठरविले नसल्याने ठरावाचा काहीही उपयोग होणार नाही. मतदानासाठी राष्ट्रवादी पक्षाने मलाही ‘व्हीप’ बजावला. याचा अर्थ अजूनही राष्ट्रवादीत आहे. राज्य शासनाकडे पाठविण्यात येणाऱ्या ठरावाविरोधात न्यायालयात दाद मागणार.                                                   - महापौर तृप्ती माळवी