शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
5
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
6
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
7
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
8
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
9
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
10
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
11
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
12
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
13
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
14
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
15
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
16
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
17
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
18
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
19
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
20
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला

By admin | Updated: August 23, 2016 01:23 IST

जिवंत असतानाही मृत असल्याचा दाखला काढल्याचा धक्कादायक प्रकार खेड तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथे घडला

आंबेठाण : जिवंत असतानाही मृत असल्याचा दाखला काढल्याचा धक्कादायक प्रकार खेड तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथे घडला आहे. सदर दाखला रोहिदास कुंडलिक जाधव या नावाच्या व्यक्तीचा असून, ‘लोकमत’च्या हाती तो लागला आहे. यातून अनेक गैरप्रकार व विविध शासकीय योजनांचा लाभ घेतल्याची शक्यता आहे. याबाबत जाधव यांना विचारले असता, आपणाला या प्रकाराबद्दल काही माहीत नाही. आम्ही स्वावलंबी असून तसा दाखला करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतचे वृत्त असे की, पिंपरी बुद्रुक (ठाकूर पिंपरी) येथील जाधव या नावाची व्यक्ती सध्यादेखील याच गावात राहत आहे. परंतु या जिवंत व्यक्तीचा २०१३ सालीच मृत्यू झाला आहे, असा मृत्यूचा दाखला ‘लोकमत’च्या हाती लागला आहे. जिवंत व्यक्तीच्या या मृत्यूच्या दाखल्यावर मृत्यू दिनांक ४ मार्च २०१३ असा लिहिण्यात आला आहे. याशिवाय हा मृत्यू पिंपरी बुद्रुक गावात झाला आहे, असाही उल्लेख आहे. नोंदणी क्रमांक हा ११९ असा टाकण्यात आला आहे. याशिवाय दाखल्यावर तत्कालीन सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवक यांच्याही शिक्क्यानिशी सह्या आहेत. सरपंच विकास ठाकूर यांना विचारले असता, अशी मृत्यूची कुठलीही नोंद आमच्या ग्रामपंचायतीमधे नाही. या बोगस दाखल्याची चौकशी करून सत्य जगासमोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे या गैरप्रकारात तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक दोघेदेखील सामील असल्याचा भयानक प्रकार पुढे येत आहे. कोणाच्या सांगण्यावरून हा दाखला बनविला असेल किंवा असा दाखला बनविण्यामागे त्यांचा उद्देश काय आहे, याचे गुलदस्त्यातील कारण शोधण्याचे दिव्य प्रशासनाला पार पाडावे लागेले. ग्रामपंचायतीमध्ये जाऊन आणि तेथील मृत्यूनोंदीचे रजिस्टर पाहिले असता त्यात २०१३ साली मयत झालेल्यांची आणि त्यांची ग्रामपंचायत दफ्तरी नोंद पाहिली असता या वर्षी फक्त १७ लोक मयत झाले असल्याची नोंद आहे. याशिवाय या मयत १७ लोकांत बनावट दाखला दिला आहे त्यांच्या नावाची नोंददेखील नाही. २०१३ साली मयत १७ लोकांची नोंद आहे व या बनावट दाखल्यावर अनुक्रमांक ११९ लिहिण्यात आला आहे. यावरून हा बनावट प्रकार लक्षात येतो. (वार्ताहर)>अशा प्रकारचे दाखले बनवून त्याच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला आहे काय?, तसेच या गावाच्या परिसरात सध्या जमिनीला प्रचंड भाव आलेले आहेत. त्यामुळे जमीन उताऱ्यावर काही फेरफार केला आहे काय? अन्य कोणाचा असा दाखला बनविला आहे काय? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.