शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

दाभोलकर, पानसरेंचे कार्य अभ्यासक्रमात यावे

By admin | Updated: March 20, 2015 01:05 IST

डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या कार्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, असे ठराव अखिल भारतीय युवा साहित्य संमेलनात समारोप समारंभात करण्यात आले.

पुणे : युवा संस्था व संमेलनांनी सामाजिक ध्येय गाठताना सामाजिक हिंसा, कृत्य करू नये; व्यक्तीने व्यक्तीवर विश्वास ठेवून संवाद वाढवावा, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या कार्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, असे ठराव अखिल भारतीय युवा साहित्य संमेलनात समारोप समारंभात करण्यात आले.टेकरेल आयोजित अखिल भारतीय मराठी युवा साहित्य संमेलनाचा समारोप बुधवारी झाला. त्यात या ठरावांसह दुष्काळी भागातील व गारपीट झालेल्या भागातील शेतकरी व विद्यार्थ्यांची जबाबदारी कल्याणकारी शासनाने स्वीकारावी, युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी राष्ट्रीय, राज्यस्तरीय संमेलने घ्यावीत व माध्यमांचा योग्य वापर करावा, मराठी भाषेला जलदरीत्या अभिजात दर्जा द्यावा, असे ठराव करण्यात आले.तरुण रक्ताला भडकावण्याची कामे होतात; पण युवकांनी कोणत्याही संघटनेत सहभागी होण्यापूर्वी हजार वेळा विचार करणे आवश्यक आहे, असे मत ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. संमेलनाच्या समारोप समारंभात ते बोलत होते.मोरे म्हणाले, ‘‘प्रत्येक धर्माकडे विवेकाने पाहिले पाहिजे, बुद्धीने नाही. धर्माचे विकृतीकरण थांबविण्याचे कार्य दाभोलकर करत असत.’’उल्हास पवार म्हणाले, ‘‘सध्या शब्दांचे रणकंदन सुरू आहे. याकरिता प्रत्येक गोष्टीचे विचार व त्यामागचा भावार्थ समजून घेणे आवश्यक आहे. लोकशाहीतून सारासार विचार संपत चालला आहे.तरुणांसाठी संमेलन हे चांगले व्यासपीठ आहे. यातून त्यांची वैचारिक पातळी वाढते व पायादेखील येथेच घातला जातो, अशी भावना उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी व्यक्त केली. सुभाष वारे म्हणाले, ‘‘आजची तरुणाई ही तक्रार करणारी नसून, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणारी आहे. यासाठी त्यांना पाठिंबा व प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.’’ सचिन परब, महेश थोरवे, भूषण कदम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)संस्कृती, परंपरा जपली पाहिजे १ संस्कृती आणि परंपरा यांचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. आपली संस्कृती काय सांगते, याचा विचार करणे गरजेचे आहे. माणूस संस्कृतीला ओझे समजतोय आणि तसेच वागतोय, असे मत अर्थ साहित्य संस्कृती अभ्यासक अभय टिळक यांनी बुधवारी व्यक्त केले.२ युवा साहित्य संमेलनात ‘चौकटीबाहेरील चर्चा’ कार्यक्रमात ‘संस्कृती आणि मुक्त चिंतन’ या विषयावर ते बोलत होते. संमेलनाच्या पहिल्या सत्रात मान्यवरांनी मते नोंदविली.३ शरद तांदळे यांनी ‘मी उद्योजक का आहे?’ यावर मत मांडले. ते म्हणाले, ‘‘प्रत्येक उद्योजकाने हा विचार करायला हवा, की मी उद्योजक का झालो? तर, जगण्यासाठी झालो. एखादा उद्योग करताना आपल्याला अर्थकारण माहीत पाहिजे. जर नसेल तर त्याची माहिती करून घेतली पाहिजे.’’४ राजकुमार तांगडे यांनी ‘मी नाटक का करतो?’ या विषयावर मत नोंदविले. ते म्हणाले, ‘‘समाजात ज्या अन्यायकारक घटना घडतात, अशा घटनांवर नाटकाद्वारे प्रकाश टाकतो. आपल्या आतमध्ये जे आहे, ते लिहिण्याचा आणि व्यक्त करण्याचा प्रयत्न नाटकातून करीत आलोय.’’