शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

‘व्होटर डे’ बनला ‘चिटर डे’! मविआच्या १०० पराभूत उमेदवारांनी ठोठावला कोर्टाचा दरवाजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 16:04 IST

मोदी सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील १८ वर्षांवरील प्रौढ लोकसंख्या तर ९.५४ कोटी आहे. या आकडेवारीनुसार १६ लाख मतदारसंख्या वाढली कशी? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला.

मुंबई - लोकशाही व्यवस्थेत निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाकडे आहे परंतु आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्याला हरताळ फासला. विधानसभेला मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा केल्याने त्याचा फायदा भाजपा महायुतीला झाला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ४८ लाख मतदार अधिक वाढले. विशेष म्हणजे २०१९ लोकसभा निवडणूक ते २०२४ ची लोकसभा निवडणूक या पाच वर्षात ३२ लाख मतदार वाढले तर मग अवघ्या सहा महिन्यात ४८ लाख मतदार कसे वाढले याचे उत्तर निवडणूक आयोगाने पुराव्यासह द्यावे अशी मागणी प्रोफेशनल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण चक्रवर्ती यांनी केली आहे.   राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून काँग्रेसने राज्यभर लोकशाहीच्या रक्षणासाठी आंदोलन केले व पत्रकार परिषदा घेतल्या. मुंबईत गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला प्रोफेशनल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण चक्रवर्ती, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी खासदार कुमार केतकर उपस्थित होते. यावेळी प्रविण चक्रवर्ती पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकूण मतदारांची संख्या ९.७ कोटी असल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे पण मोदी सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील १८ वर्षांवरील प्रौढ लोकसंख्या तर ९.५४ कोटी आहे. या आकडेवारीनुसार १६ लाख मतदारसंख्या वाढली कशी? मतदारयाद्या नोंदणीमध्ये अनेक घोळ करण्यात आले आहेत. शिर्डी मतदारसंघातील लोणी गावात एकाच पत्त्यावर ५ हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली, या मतदारांकडे काँग्रेस उमेदवार प्रतिभा घोगरे यांनी ओळखपत्र, रहिवाशी दाखल्याची विचारणा केली असता ते स्थानिक रहिवाशी नसल्याचे उघड झाले. निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केली असता त्यावर उत्तर मिळाले नाही असा आरोप त्यांनी केला. 

त्याशिवाय लोकसभा निवडणुकीनंतर १३२ विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी २० ते २५ हजार नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली. लोकसभेला यातील ६२ विधानसभा मतदारसंघात महायुती आघाडीवर होती पण विधानसभेला याच १३२ मतदारसंघातून ११२ जागी महायुतीचा विजय झाला, हे महत्वाचे आहे. मतदार याद्यातील भरमसाठ वाढ अनाकलनीय व संशयास्पद आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे माहिती मागितली असता त्यांनी अद्याप दिलेली नाही. निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली आहे, त्यांनी सर्व डेटा सार्वजनिक करावी ही काँग्रेसची मागणी आहे. २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस आहे पण निवडणूक आयोगाने या ‘व्होटर डे’ ला ‘चिटर डे’ केला असा खोचक टोला चक्रवर्ती यांनी लगावला. 

दरम्यान, राष्ट्रीय मतदार दिनी निवडणूक आयोगाला शुभेच्छा दिल्या पाहिजेत पण महाराष्ट्रातील जनता त्यांना शुभेच्छा देऊ इच्छित नाही. निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली आहे. विधानसभा निवडणुकी संदर्भात मतदार याद्यांमधील घोळ हा एक महत्वाचा मुद्दा आहे. यासंदर्भात काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात लढत आहे. विधानसभेतील मविआच्या १०० पराभूत उमेदवारांनी राज्यातील विविध न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. भारतातील लोकशाही प्रगल्भ असून जगाचे आपल्या लोकशाही व्यवस्थेकडे लक्ष असते. निवडणूक आयोग जर निवडणुकीत पक्षपात करत असेल तर तो आपल्या लोकशाहीसाठी चिंताजनक आहे असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMahayutiमहायुती