शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई मेट्रो -३, नागपूर मेट्रो मुदतीत पूर्ण करा

By admin | Updated: August 15, 2015 00:23 IST

मुंबई मेट्रो -३ तसेच नागपूर मेट्रोसाठी भूसंपादनाच्या कार्यवाहीला गती देऊन दोन्ही प्रकल्प मुदतीत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे दिले.

मुंबई : मुंबई मेट्रो -३ तसेच नागपूर मेट्रोसाठी भूसंपादनाच्या कार्यवाहीला गती देऊन दोन्ही प्रकल्प मुदतीत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे दिले.मंत्रालयातील सीएम वॉर रूममध्ये या संदर्भात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्यासह विविध विभागांचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. बैठकीत मुंबई मेट्रो-३ तसेच नागपूर मेट्रोच्या कामासाठी करावयाच्या भूसंपादनाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. मुंबई मेट्रो -३ चा कार डेपो, स्टेशन यांच्या कामासाठी ७४ हेक्टर जागा लागणार आहे. त्या संदर्भातील सादरीकरण एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले. मुख्यमंत्री म्हणाले की, जमीन संपादनाबाबतच्या अडचणी तत्काळ निकाली काढाव्यात व जमीन एमएमआरडीएकडे हस्तांतरीत करावी. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला विलंब होणार नाही. या प्रकल्पांतर्गत जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांची नियमित बैठक घेण्यात यावी. त्यांना पुर्नवसनाबाबत वेळच्या वेळी माहिती दिल्यास प्रकल्पाला असलेला विरोध मावळण्यास मदत होईल.