शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
4
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
5
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
6
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
7
किती लाजिरवाणं आहे! 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलिया भटकडे फोटोग्राफर्सचं दुर्लक्ष? व्हिडीओ व्हायरल
8
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
9
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
10
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
11
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
12
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
13
Gold-Silver Price Today: चांदी ₹३ लाखांच्या पार, सोनं ₹१० हजारांनी महागलं, इम्पोर्ट ड्युटी वाढल्यानंतर काय आहे २४K, २२K, १८K चा भाव?
14
प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?
15
Prateek Yadav: फिटनेसचे वेड, लक्झरी गाड्यांचा शौक, प्राण्यांबद्दल आपुलकी; प्रतीक यादवबद्दल काही खास गोष्टी!
16
हाण की बडीव! "तुझ्या भागातील डास मला चावताहेत..."; मच्छरदाणीवरुन रूममेट्स भिडले
17
Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं (Video)
18
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा झटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
19
Aparna Yadav: किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
20
अलविदा इंडिया! १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडला देश, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याच्या नावानं कंपनीचं ‘चांगभलं’

By admin | Updated: July 4, 2014 01:06 IST

पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांना बँकाकडून पीक विमा काढण्यासाठी प्रवृत्त केले जाते. कृषी विभागही पीक विम्यासाठी आग्रही असतो. नापिकी होवूनही शेतकऱ्यांना हा विमा मिळत नाही. २०१३ चा खरीप हंगाम

शेतकरी वाऱ्यावर : प्रिमीयम कोट्यवधींचे अन् लाभ मात्र तोकडा
संतोष अरसोड - यवतमाळ
पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांना बँकाकडून पीक विमा काढण्यासाठी प्रवृत्त केले जाते. कृषी विभागही पीक विम्यासाठी आग्रही असतो. नापिकी होवूनही शेतकऱ्यांना हा विमा मिळत नाही. २०१३ चा खरीप हंगाम पुरता उद्ध्वस्त होवूनही पीक विमा कंपन्या पावसासारख्याच गायब झाल्या आहेत. यामुळे आता विमा काढणाऱ्या कंपन्यांवरील शेतकऱ्यांचा विश्वास उडाला आहे.
गेल्या खरीप हंगामात यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. दोन लाख हेक्टरवरील पिकांचे पन्नास टक्क्यावर नुकसान झाले. चार हजार ६४६ हेक्टरवरील जमीन खरडून गेली. आणेवारीसुध्दा पन्नास टक्केच्या आत आली. दुबार-तिबार पेरणीने शेतकरी आर्थिक चकव्युहात सापडले. त्यानंतर रबी हंगामात गारपिटीने एक लाख हेक्टरवरील पिके नष्ट केलीत. खरीप हंगामात विमा काढलेल्या शेतकऱ्यांना एवढ्या भीषण स्थितीतही विमा मिळण्याची चिन्हे दिसत नसून लोकप्रतिनिधी मात्र गप्प आहेत.
कापूस, सोयाबीन, मूग आणि उडीद या पिकांकरीता अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी आॅफ इंडियाच्यावतीने पीक विमा योजना राबविण्यात येते. कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना विमा काढण्याची सक्ती करण्यात येते. मात्र भरपाई ठरविण्याची पध्दत किचकट असल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक संरक्षण कमी आणि कंपन्यांचे जादा असा प्रकार होत आहे. विमा काढूनही शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नसल्यामुळे या कंपन्याविषयी शेतकऱ्यांच्या मनात संतापाची लाट उसळली आहे. संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नावाखाली कंपनीने कोट्यवधी रूपयाने गंडा घातल्याची चर्चा सर्वत्र ऐकू येते. विमा काढणाऱ्या कंपनीवर कुणाचेही नियंत्रण नसते. गेल्या तीन वर्षात ७० ते ८० टक्के पेक्षा कमी उत्पादन झालेल्या संपूर्ण मंडळातील शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ घेता येईल, ही अटही जीवघेणी आहे. पीक विमा काढत असताना शेतकऱ्यांनाही रक्कम भरावीच लागते. खरीप हंगाम २०१३-१४ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख १२ हजार ८९१ सभासदांनी पीक विम्यापोटी कंपनीकडे सहा कोटी ९६ लाख १९ हजार रूपये जमा केलेत. त्या हंगामात जिल्हयातील शेती नैसर्गिक प्रकोपाने उद्ध्वस्त झाली.