शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार; दोघांची भेट लक्षवेधी ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 12:06 IST

राज्याच्या राजकारणात पडद्यामागे घडणाऱ्या गोष्टींवर बरीच चर्चा सुरू असते. त्यामुळे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आज एकाच मंचावर येत असल्याने सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एका खासगी कार्यक्रमासाठी एकाच मंचावर येणार आहेत. मुंबईतील ताज लँडस हॉटेलमध्ये पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे उपस्थित राहणार आहे. याआधीही राज आणि फडणवीस मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमाच्या सोहळ्यानिमित्त एकत्र येणार होते. परंतु मुख्यमंत्री फडणवीस पुण्यात असल्याने त्यांना उपस्थित राहता आले नाही. मात्र आज अनेक दिवसांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर येत आहेत. 

माधव अगस्ती यांच्या बॉलिवूड फॅशन इंडस्ट्रीतील ५० वर्षाच्या कारकिर्दीनिमित्त ताज लँड्स हॉटेलमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. त्यात पुस्तक प्रकाशनही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रित केले आहे. हे दोन्ही नेते या कार्यक्रमानिमित्त एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये काय बोलणे होते याची उत्सुकता सगळ्यांना आहे. 

राज ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची आजची भेट लक्षवेधी

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजले आहे. त्यात मागील काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जवळीक वाढली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुका मनसेने स्वबळावर लढल्या. मात्र त्यात मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. आता महापालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील कटुता संपल्याचे दिसून येते. त्यात मतचोरीचा आरोप करत राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगासोबतच भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. त्यामुळे इतक्या दिवसांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट लक्षवेधी ठरणार आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातील मैत्री बऱ्याचदा दिसून आली आहे. फडणवीस हे अनेकदा शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. राज ठाकरे हेदेखील फडणवीस यांना भेटायला जात असतात. मागील काळात राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची एका हॉटेलमध्ये भेट झाल्याचं समोर आले होते. या भेटीनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जवळीक वाढली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पडद्यामागे घडणाऱ्या गोष्टींवर बरीच चर्चा सुरू असते. त्यामुळे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आज एकाच मंचावर येत असल्याने सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : CM Fadnavis and Raj Thackeray to share stage; meeting noteworthy.

Web Summary : CM Fadnavis and MNS chief Raj Thackeray will attend a book launch in Mumbai. Their meeting gains significance amidst upcoming local elections and Thackeray's recent closeness with Uddhav Thackeray. Past meetings spark political speculation.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसे